Shubhman Gill WTC Final : शुबमन गिलवर ICC ची कारवाई, टीम इंडियालाही दिला मोठा झटका

Shubhman Gill WTC Final : शुबमन गिलला ICC ने काय शिक्षा सुनावलीय? आणि ही शिक्षा का? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाल्यानंतर ICC ने शिक्षा जाहीर केली.

Shubhman Gill WTC Final : शुबमन गिलवर ICC ची कारवाई, टीम इंडियालाही दिला मोठा झटका
icc action on shubman gillImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 1:49 PM

लंडन : टीम इंडियाचा स्टार ओपनर शुबमन गिलला शिक्षा सुनावण्यात आली आहे. क्रिकेटची सर्वोच्च संस्था ICC ने ही शिक्षा सुनावलीय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाल्यानंतर ICC ने शिक्षा जाहीर केली. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, ICC ने शुबमनला काय शिक्षा सुनावलीय?. फक्त गिलच नाही, ICC ने टीम इंडियाला सुद्धा झटका दिलाय. कालच WTC फायनल संपली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी मोठा पराभव केला.

या पराभवामुळे टीम इंडिया आणि त्यांचे फॅन्स निराश असताना आता ICC ने झटका दिला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, आयसीसीने शिक्षा का सुनावली? काय झालय?

काय शिक्षा?

शुबमन गिलला काय शिक्षा झालीय ? ते सांगण्याआधी भारतीय क्रिकेट टीमला सुद्धा WTC फायनल खेळण्याचा एक रुपयाही मिळणार नाही. ICC ने टीम इंडियावर ही कारवाई स्लो ओव्हररेटवरुन केलीय. याच स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाची 80 टक्के मॅच फी कापण्यात आलीय. शुबमन गिलला जी शिक्षा सुनावलीय, त्यानुसार त्याला दंड म्हणून ICC ला पैसे भरावे लागणार आहेत.

शुबमनला एकूण फाईन किती ?

भारताचा स्टार ओपनर शुबमन गिलला सुद्धा सजा सुनावलीय. त्याची पूर्ण मॅच फी कापलीच. पण त्याशिवाय त्याला दंड म्हणून 15 टक्के अधिक रक्कम भरावी लागेल. भारताच्या या युवा ओपनरला मॅच फी च्या 115 टक्के फाइन लागला आहे.

गिलवर कारवाई का? त्याने काय चूक केली?

ICC ने शुबमन गिलवर ही दंडात्मक कारवाई WTC Final च्या चौथ्या दिवशी केलेल्या चुकीबद्दल केली. टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी शुबमन गिलला ICC कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.7 मध्ये दोषी धरण्यात आलय. या नियमानुसार, खेळाडूला आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये घडलेल्या घटनेवर कमेंट करण्यास मनाई आहे. पण गिलने हीच चूक केली.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

आयसीसीने दाखवून दिली चूक

टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीव्ही अंपायर रिचर्ड केटलब्रो यांनी कॅमरुन ग्रीनने पकडलेली शुबमन गिलची कॅच क्लीन असल्याचा निकाल दिला. या कॅचवरुन डाऊट असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शुबमन गिलने दिवसाचा खेळ संपल्यानंतर सोशल मीडियावर या कॅचबद्दल भाष्य केले. आयसीसीच्या नियमानुसार ती त्याची चूक होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.