Hardik-Natasa Divorce : हार्दिकसोबत नातं तुटताच लोकांनी नताशाच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडल्या

Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याच्या बाबतीत मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरु होती, अखेर तेच घडलं. हार्दिक पांड्याचा नताशा स्टानकोविकसोबत घटस्फोट झाला. हार्दिक-नताशाचा घटस्फोट होताच, नेटीझन्सनी ट्रोल करताना त्यांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाचा हिरो आहे.

Hardik-Natasa Divorce : हार्दिकसोबत नातं तुटताच लोकांनी नताशाच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडल्या
आम्ही परस्पर संमंतीने विभक्त होत आहोत... अशी घोषणा हार्दिक - नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 9:58 AM

टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या बाबतीत मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा होती, अखेर तेच घडलं. हार्दिकच्या बाबतीत कालच्या दिवसात दोन वाईट गोष्टी घडल्या. पहिलं म्हणजे प्रबळ दावेदार असूनही त्याच्याजागी सूर्यकुमार यादवची T20 संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. दुसर म्हणजे काल त्याने नताशा स्टानकोविकपासून घटस्फोट घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. मागच्या काही दिवसांपासून हार्दिकच्या व्यक्तीगत आयुष्यात सर्वकाही सुरळीत नाहीय, हीच चर्चा होती. काल हार्दिक आणि नताशाने परस्परापासून विभक्त होत असल्याच जाहीर केलं. परस्पर सहमतीने वेगळे होत आहोत, हे त्यांनी स्पष्ट केलं. हार्दिक आणि नताशाने दोनवेळा लग्न केलं. 2020 आणि 2023 मध्ये. अवघ्या 4 वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला.

मुलगा अगस्त्यसोबत नताशाने मुंबई सोडल्यानंतर घटस्फोटाची दोघांनी घटस्फोट घेतल्याच जाहीर केलं. हार्दिक आणि नताशाने इन्स्टाग्रामवर घटस्फोटाची घोषणा करताना कमेंट सेक्शन बंद केलं. पण इंटरनेट युजर्सनी त्यांच्या पद्धतीने व्यक्त होण्याचे मार्ग शोधून काढले. घटस्फोट जाहीर झाल्यानंतर नताशाला मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोल केलं जातय. ‘विश्वास ठेवणं कठीण आहे’ असं एका युजरने म्हटलय. ‘इतक्या चांगल्या माणसाला ओळखू शकली नाही’ असं दुसऱ्या युजरने म्हटलय.

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

‘सोडून द्या सर तिला’

हार्दिकला यापेक्षा दुसरी चांगली मुलगी मिळेल असं एका युजरने म्हटलय. ‘सोडून द्या सर तिला, तिच्यापेक्षा तुम्हाला चांगली मुलगी मिळेल’ असं दुसऱ्या युजरने म्हटलय. नताशाला घटस्फोटानंतर किती रक्कम मिळणार? याची सुद्धा उत्सुक्ता आहे. ‘हार्दिक भय्या किती प्रॉपर्टी घेऊन चाललीय’ असं एका युजरने विचारलय. ट्रोलर्स मर्यादा ओलांडणार याची कल्पना असल्यानेच हार्दिक आणि नताशाने त्यांचं कमेंट सेक्शन बंद केलं आहे. नताशाने आधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या नाव हटवलं. त्यानंतर तिने हार्दिक सोबतच फोटो डिलीट केले, तेव्हाच दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.