Mumbai Indians Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये, आता फक्त एकच टेन्शन, लवकर यावर तोडगा हवाच

Mumbai Indians Playoff : तेव्हाच मुंबई इंडियन्सला 'दुनिया हिला देंगे' शक्य होईल. मुंबईच सहाव्यांदा ट्रॉफी उंचावण्याचा स्वप्न आहे. या मार्गात फक्त एक अडथळा आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला यावर काम कराव लागेल.

Mumbai Indians Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये, आता फक्त एकच टेन्शन, लवकर यावर तोडगा हवाच
Mumbai indians playoff IPL 2023Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 8:14 AM

मुंबई : गुजरात टायटन्सने रविवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात टायटन्सला विजयासाठी 198 धावांचा टार्गेट दिलं होतं. गुजरातने 5 चेंडू आणि 6 विकेट राखू विजयी लक्ष्य गाठलं. शुभमन गिलच्या 52 चेंडूतील नाबाद 104 धावांच्या खेळीमुळे गुजरातला हा विजय मिळवता आला. RCB चा ओपनर विराट कोहलीची 61 चेंडूतील नाबाद 101 धावांची खेळी व्यर्थ गेली.

मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमधील प्रवेशासाठी गुजरातने RCB वर विजय मिळवणं आवश्यक होतं. RCB जिंकली असती, तर मुंबईच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असतं. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा RCB विरुद्ध GT सामन्याकडे होत्या.

पुढचा प्रवास का सोपा नाहीय?

अखेरीस गुजरातच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच प्लेऑफमध्ये खेळण्याच स्वप्न साकार झालं. प्लेऑफमध्ये प्रवेश केला, पण मुंबई इंडियन्ससाठी पुढचा प्रवास सोपा नाहीय. त्यांच्यासमोर लखनऊ सुपर जायंट्सच आव्हान असणार आहे. लखनऊचा अडथळा पार केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स किंवा गुजरात टायटन्स यापैकी एकाशी गाठ पडू शकते.

आता दुसरी संधी नाही

महत्वाच म्हणजे मुंबईची टीम चौथ्या स्थानावर आहे. म्हणजे मुंबईला एलिमिनेटरचा सामना खेळायचा आहे. म्हणजे एक हार, गेम ओव्हर असा प्रकार आहे. आता बाद फेरीत दुसरी संधी नाहीय. त्यामुळे मुंबई इंडियन्सला कुठलीही चूक परवडणारी नाहीय. मुंबईला आपल्या कमकुवत बाजूंवर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

मुंबईच मोठं दुखण काय?

तुम्ही म्हणाल, मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू काय?, या प्रश्नाच उत्तर सरळ आहे बॉलिंग. मुंबई इंडियन्सकडे दोन चांगल्या बॉलर्सची कमतरता आहे. तेच या सीजनमध्ये मुंबईच मोठं दुखण आहे. मुंबई इंडियन्सच्या या सीजनमधील प्रदर्शनावर नजर टाकली, तर मुंबई इंडियन्सने बहुतांश सामन्यात 200 धावांच लक्ष्य सहज पार केल्याच दिसेल. हे शक्य झालं, भक्कम फलंदाजीमुळे.

मुंबईच काय चुकतय?

समोरच्या टीम्सनी मुंबई इंडियन्स विरुद्ध सहज 200 धावा मारल्या. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये जवळपास सहा ते सात सामन्यात मुंबई इंडियन्स समोर 200 पेक्षा जास्त धावांच लक्ष्य होतं. साखळीत पंजाबने मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. सातव्या सामन्यात गुजरातने मुंबईला आस्मान दाखवलं. मुंबईला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं.

ही चिंतेची बाब

आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. राजस्थानने 213 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबकडून साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. अगदी कालच्या सामन्यातही सनरायजर्स हैदराबादने 200 धावा केल्या. प्रतिस्पर्धी टीम मुंबई विरुद्ध सहज 200 धावा फटकावते ही चिंतेची बाब आहे. ….तरच सहाव्यांदा IPL ट्रॉफी उचलण्याचा स्वप्न होईल साकार

खासकरुन डेथ ओव्हर्समध्ये मुंबईचे गोलंदाज मार खातात. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 54 धावा चोपल्या. कालही हैदराबादची टीम 220-225 धावांपर्यंत पोहोचली असती. पण डेथ ओव्हर्समध्ये थोडी चांगली बॉलिंग केल्याने हैदराबादला 200 धावा्ंवर रोखले. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला गोलंदाजीच्या या कमकुवत बाजूवर काम कराव लागेल, तरच मुंबईच सहाव्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवण्याचा स्वप्न साकार होईल.

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.