IPL 2024 : पराभव जिव्हारी लागला, RCB च्या कोचकडून सर्वांसमोर गोलंदाजांचा अपमान, सरळ म्हटलं…

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या सीजनची सुरुवात बंगळुरुसाठी खराब झाली. टीमने 8 पैकी 7 सामने हरले होते. त्यानंतर सलग 6 सामने जिंकून जोरदार पुनरागमन केलं. प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पण शेवटी निकाल तोच राहिला, ज्याची टुर्नामेंट सुरु होण्याआधीपासून भीती होती.

IPL 2024 : पराभव जिव्हारी लागला, RCB च्या कोचकडून सर्वांसमोर गोलंदाजांचा अपमान, सरळ म्हटलं...
RCB Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:50 AM

फुटबॉलच्या खेळात नेहमी एक वाक्य बोललं जातं. ‘स्ट्राइकर तुम्हाला मॅच जिंकवतो, पण डिफेंडर तुम्हाला चॅम्पियन बनवतो’. क्रिकेटमध्ये सुद्धा असच काहीस आहे. ‘फलंदाज तुम्हाला मॅच जिंकवतात, पण गोलंदाज तुम्हाला चॅम्पियनशिप मिळवून देतात’ आयपीएलमध्ये चांगला बॉलिंग अटॅक असलेल्या टीम यशस्वी ठरल्या आहेत. त्याचवेळी काही टीम यशस्वी ठरु शकल्या नाहीत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एक टीम आहे. लीगच्या 17 व्या सीजनमध्ये सुद्धा RCB किताब जिंकण्यात अयशस्वी ठरली. आता या टीमच्या कोचने जे म्हटलय, तीच गोष्ट अनेक दिग्गज अनेक वर्षांपासून बोलतायत.

आयपीएल 2024 च्या सीजनची सुरुवात बंगळुरुसाठी खराब झाली. टीमने 8 पैकी 7 सामने हरले होते. त्यानंतर सलग 6 सामने जिंकून जोरदार पुनरागमन केलं. प्लेऑफमध्ये प्रवेश केला. इथे एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना 4 विकेटने हरवलं. त्यामुळे स्पर्धेतील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. सलग 17 व्या सीजनमध्ये RCB किताबापासून वंचित झाली. टुर्नामेंट सुरु होण्याआधीपासून आरसीबीकडे गोलंदाजांची जी फळी होती, त्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

अँडी फ्लॉवर यांच्याकडून कसली कबुली?

टुर्नामेंट सुरु झाल्यानंतर RCB च्या गोलंदाजीतील कमतरता स्पष्टपणे दिसू लागली. दुसऱ्या हाफमध्ये गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. पण, तरीही विश्वास ठेवावा, अशी गोलंदाजांची फळी नव्हती. खासकरुन होमग्राऊंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बॉलिंग RCB साठी डोकेदुखी ठरली. होमग्राऊंडचा फायदा उचलता आला पाहिजे, त्यासाठी समजदार गोलंदाजांची गरज आहे हे राजस्थान विरुद्ध पराभवानंतर टीमचे कोच अँडी फ्लॉवर यांनी कबूल केलं.

अँडी फ्लॉवर यांनी स्पष्टपणे काय म्हटलं?

“चिन्नास्वामी स्टेडियमवर यश मिळवण्यासाठी फक्त वेगाची नाही, तर योग्य कौशल्य असलेल्या गोलंदाजांची गरज आहे” असं फ्लॉवर मॅच संपल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले. “चिन्नास्वामी स्टेडियमच्या गरजेनुसार जी योजना बनवण्यात आलीय, ती प्रत्यक्षात आणू शकतील अशा डोकं असलेल्या कुशल गोलंदाजांची गरज आहे” असं RCB कोचने स्पष्टपणे म्हटलं. जे धावांची लय कायम ठेवतील अशा ताकदवान फलंदाजांची गरज असल्याचही त्यांनी मान्य केलं.

Non Stop LIVE Update
अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा?महिला, बेरोजगार अन् शेतकऱ्यांना काय मिळणार?
अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा?महिला, बेरोजगार अन् शेतकऱ्यांना काय मिळणार?.
अवघ्या काही मिनिटांनी राज्याचा अर्थसंकल्प, कोणाला नेमकं काय मिळणार?
अवघ्या काही मिनिटांनी राज्याचा अर्थसंकल्प, कोणाला नेमकं काय मिळणार?.
जरांगे पाटलांच्या गावात तुफान दगडफेक, नेमकं काय घडलं? तणावाचं वातावरण
जरांगे पाटलांच्या गावात तुफान दगडफेक, नेमकं काय घडलं? तणावाचं वातावरण.
राज्यभरात पावसाची बॅटिंग, 'या' जिल्ह्याला IMD चा कोणता अलर्ट?
राज्यभरात पावसाची बॅटिंग, 'या' जिल्ह्याला IMD चा कोणता अलर्ट?.
दोन वर्षात पहिल्यांदा ठाकरे-फडणवीस इतक्या जवळ, दोघंही लिफ्टमध्ये एकत्र
दोन वर्षात पहिल्यांदा ठाकरे-फडणवीस इतक्या जवळ, दोघंही लिफ्टमध्ये एकत्र.
लोकसभेत भाजपने पत्रकारांना पैसे वाटले?'त्या' व्हिडीओने वाद चव्हाट्यावर
लोकसभेत भाजपने पत्रकारांना पैसे वाटले?'त्या' व्हिडीओने वाद चव्हाट्यावर.
अजित पवार बोकांडी बसलेत, त्यांना महायुतीतून काढा, दादांवर कोण भडकलं?
अजित पवार बोकांडी बसलेत, त्यांना महायुतीतून काढा, दादांवर कोण भडकलं?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, हवामान खात्यानं कोकणाला काय दिला अलर्ट?
रत्नागिरीत तुफान पाऊस, हवामान खात्यानं कोकणाला काय दिला अलर्ट?.
हस्तांदोलन अन् हास्य विनोद... विधान भवनात अचानक भेट?; भेटीत दडलंय काय?
हस्तांदोलन अन् हास्य विनोद... विधान भवनात अचानक भेट?; भेटीत दडलंय काय?.
फडणवीसांसोबतच्या प्रवासानंतर ठाकरे म्हणाले, पुढील चर्चा लिफ्टमध्येच...
फडणवीसांसोबतच्या प्रवासानंतर ठाकरे म्हणाले, पुढील चर्चा लिफ्टमध्येच....