सुट्टीवरुन परतल्यानंतर Virat Kohli थेट रुग्णालयात गेला, सोबत पत्नी अनुष्का शर्माही होती, सर्व ठीक आहे ना?

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. नुकताच विराट कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता.

सुट्टीवरुन परतल्यानंतर Virat Kohli थेट रुग्णालयात गेला, सोबत पत्नी अनुष्का शर्माही होती, सर्व ठीक आहे ना?
Virat kohli-Anushka SharmaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 2:04 PM

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. नुकताच विराट कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. विराट, पत्नी अनुष्का (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकाला (Vamika) घेऊन फिरायला गेला होता. विराट रिफ्रेश होऊन परतला. पण मुंबईत आल्यानंतर विराट रुग्णालयात जाताना दिसला. यामागे काय कारण आहे? ते अजून समजलेलं नाही. पण विराट कोहलीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीने खराब प्रदर्शन केलं. त्याला लौकीकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाच्या सिनीयर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याचा, रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. विराट विश्रांतीच्या या काळात कुटुंबासोबत भ्रमंतीला गेला होता. त्याने स्वत:चा शर्टलेस फोटो शेयर केला. पत्नी अनुष्काने बिकनीमधले फोटो पोस्ट केले होते.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

टीम इंडिया आघाडीवर

सुट्टया संपल्या असून त्याला आता विराट परिक्षेला सामोर जावं लागणार आहे. भारतीय संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तिथे त्यांना एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळायचे आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अपूर्ण राहिलेल्या या मालिकेत चार पैकी दोन कसोटी जिंकून टीम इंडिया आघाडीवर आहे. आता एजबेस्टन येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.

विराट नाही रोहित चालला

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराटची बॅट तळपली नव्हती. 7 इनिंगमध्ये त्याने 31.14 च्या सरासरीने 218 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने दोन अर्धशतक झळकावली होती. एकदा तो शुन्यावरही आऊट झाला. या सीरीजमध्ये रोहित शर्माने 50 च्या सरासरीने 368 धावा केल्या. शेवटच्या कसोटीत विराट आणि रोहित दोघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जाडेजा, आर.अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा,

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.