WTC Final 2023 : त्यावेळी एक शब्दही का नाही बोललात? इरफान पठान-रवी शास्त्रींना सोयीस्कर विसर?

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर BCCI ला बरेच सल्ले दिले जात आहेत. पण सल्ले देणारे IPL 2023 दरम्यान गप्प होते. आता बोलून काय उपयोग?

WTC Final 2023 : त्यावेळी एक शब्दही का नाही बोललात? इरफान पठान-रवी शास्त्रींना सोयीस्कर विसर?
irfan pathan-Ravi shastriImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 2:54 PM

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी टीम इंडियाला हरवलं. भारताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियन टीम भारी पडली. त्यांनी रोहित शर्माच्या टीमला पुनरागमनाची कुठली संधीच दिली नाही. टीम इंडियाच्या WTC फायनलमधील पराभवानंतर IPL ला जबाबदार धरलं जातय.

चेतेश्वर पुजारा वगळता भारतीय स्क्वॉडमधील सर्व प्लेयर आयपीएल खेळून थेट लंडनला पोहोचले होते. फॅन्स पराभवासाठी आयपीएलला जबाबदार धरतायत.

त्यावेळी कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेटमधील दिग्गजही आयपीएलच पराभवासाठी कारण असल्याच सांगतायत. महत्वाच म्हणजे या दिग्गजांनी आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडूंच भरपूर कौतुक केलं होतं. त्यावेळी ब्रेक बद्दल काही बोललेच नव्हते. आयपीएल सुरु होण्याआधीच भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये भिडणार हे निश्चित होतं.

टि्वटमध्ये काय म्हटलं?

खेळाडूंना माहित होतं, लीग संपल्यानंतर त्यांना लंडनला जायचय. इरफान पठान, रवी शास्त्री आणि रिकी पॉन्टिंग स्वत: 2 महिने आयपीएलमध्ये व्यस्त होते. पठान आणि शास्त्री क़ॉमेंटेटर होते. पॉन्टिंग दिल्ली कॅपिटल्सचे कोच होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप दरम्यान इरफान पठानने भारताच्या खराब गोलंदाजीमागे आयपीएल असल्याच म्हटलं होतं.

तो कधीही या मुद्दावर बोलला नाही

पठानने थेट आयपीएलच नाव घेतलं नव्हतं. पण टि्वट करुन असं लिहिल होतं की, “4 ओव्हर बॉलिंग केल्यानंतर एकदिवसात थेट 15 ते 20 ओव्हर बॉलिंग करणं मोठी जम्प असते” पठानला WTC फायनल दरम्यान ही गोष्ट आठवली. आयपीएल दरम्यान तो कधीही या मुद्दावर एकदाही बोलला नाही. सोशल मीडियावरही त्याने आयपीएल दरम्यान प्लेयर्स बद्दल बरच काही लिहिलं होतं. पण WTC फायनल बद्दल त्यात एक शब्दही नव्हता. शास्त्रींनी बीसीसीआयला काय सल्ला दिला?

WTC मधील पराभवानंतर रवी शास्त्री यांनी, बीसीसीआयला आयपीएलच्या नियमांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिलाय. देशासाठी क्रिकेट की, आयपीएल हे तुम्हाला ठरवायच आहे. मोठ्या इवेंट्स दरम्यान खेळाडूंना आयपीएलमध्ये अनुमती मिळू नये, यासाठी आयपीएल कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज असला पाहिजे, असा सल्लाही शास्त्रींनी दिला. शास्त्री आयपीएल दरम्यान शुभमन गिल, विराट कोहली यांचं तोंडभरुन कौतुक करत होते. पण त्यावेळी त्यांना WTC फायनल आठवली नाही.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.