INDIA Won T20 World Cup : हा VIDEO बघा, एक भारतीय म्हणून तुमचा उर अभिमानाने भरुन येईल

INDIA Won T20 World Cup : तो पराभव मनाला चुपपूट लावून गेला होता. आता पुन्हा अशी संधी कधी मिळणार? हा प्रश्न कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. रोहित शर्माच्या टीमने कमाल केली. अवघ्या 7 महिन्यात रोहितच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा वर्ल्ड कपची फायनल गाठली.

INDIA Won T20 World Cup : हा VIDEO बघा, एक भारतीय म्हणून तुमचा उर अभिमानाने भरुन येईल
Rohit_Sharma Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 2:44 PM

टीम इंडियाने काल संपूर्ण भारत देशाला एक गोड आठवण दिली. पुढच्या काही वर्षांसाठी हा क्षण समस्त भारतीयांच्या मनात कोरला गेलाय. एक स्वप्न सत्यात उतरलं. मागच्या 13 वर्षांपासून देशवासीय या क्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ही संधी हुकली. टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. तो पराभव मनाला चुपपूट लावून गेला होता. आता पुन्हा अशी संधी कधी मिळणार? हा प्रश्न कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. रोहित शर्माच्या टीमने कमाल केली. अवघ्या 7 महिन्यात रोहितच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा वर्ल्ड कपची फायनल गाठली. काल वेस्ट इंडिजच्या बारबाडोसमध्ये टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 च विजेतेपद मिळवलं.

टीम इंडियासोबतच कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा कधीही न विसरता येणारा क्षण आहे. आपण वर्ल्ड कप जिंकलोय या भावनेने समस्त भारतीयांचा उर अभिमानाने भरुन आलाय. अनेकांच्या डोळ्यात अश्रु आले. कारण तो क्षणच असा खास होता. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवून दुसरा T20 वर्ल्ड कप जिंकला. भारताने क्रिकेटमधला वर्ल्ड कप जिंकण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी 1983, 2011 असं दोनवेळा वनडे वर्ल्ड कप 2007 आणि 2024 असा दोनवेळा T20 वर्ल्ड कप जिंकलाय.

बातमीतल ते वाक्य प्रत्यक्षात उतरलं

भारतात क्रिकेट एका धर्मासमान आह. क्रिकेटपटूंवर जीव ओवाळून टाकणारे चाहते आहेत. क्रिकेटमधल्या जय-पराजयामुळे भारतीय भावनिक होतात. याआधी भारताने शेवटचा वर्ल्ड कप 13 वर्षापूर्वी जिंकला होता. तेव्हापासून चाहते पुन्हा एकदा हा क्षण अनुभवण्यासाठी आतुर होते. अखेर 29 जून 2024 चा दिवस ऐतिहासिक ठरला. टीम इंडियाने बारबाडोसच्या मैदानावर इतिहास रचला.

बातमी लिहिताना अनेकदा विजयाचा झेंडा रोवला असं म्हणतो. काल टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बातमीतल ते वाक्य प्रत्यक्षात उतरलं. कॅप्टन रोहित शर्माने बारबाडोसच्या मैदानात भारताचा झेंडा रोवला. हा व्हिडिओ पाहताना एक भारतीय म्हणून तुमचा उर खरच अभिमानाने भरुन येईल.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.