AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : भारताचा वर्ल्ड कप विजय पाकिस्तानी पत्रकाराला झोंबला, ICC कडे थेट बुमराह विरोधात ‘ही’ मागणी

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने 29 जूनला शनिवारी बार्बाडोसच्या मैदानात इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. 17 वर्षानंतर T20 मध्ये भारताने पुन्हा एकदा जेतेपद मिळवलय. यामुळे सगळ्या देशात उत्साह, आनंद आहे. पण शेजारच्या पाकिस्तानात मात्र, एका पत्रकाराचा जळफळाट झाला आहे. टीम इंडियाच हे यश त्याला पहावत नाहीय.

T20 World Cup 2024 : भारताचा वर्ल्ड कप विजय पाकिस्तानी पत्रकाराला झोंबला, ICC कडे थेट बुमराह विरोधात 'ही' मागणी
Jasprit BumrahImage Credit source: PTI
| Updated on: Jul 01, 2024 | 8:01 AM
Share

क्रिकेट विश्वात भारतीय क्रिकेट टीम फलंदाजीसाठी ओळखली जाते. भारतीय क्रिकेटमधल्या अनेक फलंदाजांनी जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं. पण मोठ्या टुर्नामेंटमध्ये नेहमीच एका चांगल्या गोलंदाजाची कमतरता जाणवायची. ही कमतरता आता जसप्रीत बुमराहने भरुन काढलीय. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बुमराहच्या घातक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. भारतीय क्रिकेट टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात जसप्रीत बुमराहच महत्त्वाच योगदान आहे. त्यासाठी बुमराहला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कारही देण्यात आला. पाकिस्तानची टीम वेगवान गोलंदाजांसाठी ओळखली जाते. आज बुमराहला त्याच्या गोलंदाजीसाठी जे यश, किर्ती, प्रसिद्धी मिळतेय, ती पाकिस्तानला बघवत नाहीय. म्हणूनच एका पाकिस्तानी पत्रकाराने ICC कडे बुमराहच्या Action ची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ICC ने नेहमीच पाकिस्तानी गोलंदाजांविरोधात कारवाई केली आहे. पाकिस्तानचा कुठलाही गोलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करतो, तेव्हा त्याची चौकशी सुरु होते. पण जसप्रीत बुमराहच्या वेगळ्या Action ची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पाकिस्तानी चॅनल जियो न्यूजचे पत्रकार आरफा फिरोज यांनी केली आहे. बुमराहची बॉलिंग Action नियमांमध्ये बसते की, नाही हे आयसीसीने तपासल पाहिजे असं आरफा फिरोज यांनी म्हटलय.

….तेव्हा सगळ्यांच्या नजरेत आला

जसप्रीत बुमराह देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातच्या टीमकडून खेळतो. तो त्याच्या वेगळ्या बॉलिंग एक्शनसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केल्यानंतर बुमराह सगळ्यांच्या नजरेत आला. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने टीमला अनेक मॅचमध्ये विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. क्रिकेट एक्सपर्ट्सनुसार, बुमराह त्याच्या बॉलिंग Action मुळे इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा ठरतो. जशी वर्ष पुढे सरकतायत, तशी बुमराहची गोलंदाजी अधिक घातक बनत चालली आहे. सध्या त्याची गोलंदाजी खेळण कुठल्याही फलंदाजासाठी सोप नाहीय.

याआधी हा रेकॉर्ड सुनील नरेनच्या नावावर

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जसप्रीत बुमराहने इतिहास रचलाय. पहिल्यांदा या टुर्नामेंटमध्ये कुठला गोलंदाज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. त्याशिवाय T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील इकॉनमिकल गोलंदाज बनला आहे. बुमराहने या टुर्नामेंटमध्ये 8 सामन्यात 15 विकेट काढलेत. फक्त 4.17 च्या इकॉनमीने रन्स दिले. याआधी हा रेकॉर्ड सुनील नरेनच्या नावावर होता. म्हणून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारासाठी त्याची निवड झाली.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.