Mumbai Indians IPL 2023 : सेलिब्रेशन दूर राहिलं, विजयानंतर रात्रभर जागली मुंबईची मुलं, विजयानंतर काय घडलं? VIDEO
Mumbai Indians IPL 2023 : घामाने भिजलेले अंगावरचे कपडे सुद्धा नाही बदलता आले. मुंबई इंडियन्सची टीम क्वालिफायर 2 मध्ये पोहोचली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.
चेन्नई : मुंबई इंडियन्स IPL 2023 मध्ये दुसरा क्वालिफायर सामना खेळणार आहे. रोहित शर्माची टीम विजेतेपदापासून 2 पावलं दूर आहे. चेन्नमध्ये एलिमिनेटरचा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी विजय मिळवला. विजयानंतर मुंबई खेळाडू हाय जोशमध्ये होते. पण आता त्यांची एनर्जी लो झाली आहे. लखनऊला पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमने मैदानावर सेलिब्रेशन केलं. ड्रेसिंग रुममध्ये सुद्धा थोडं सेलिब्रेशन झालं. पण त्यानंतर जे झालं, त्यामुळे खेळाडूंची हालत खराब आहे.
क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबईच्या टीमला रात्री झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही. खेळाडूंना रात्र जागून काढावी लागली. फायलनमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सशी खेळाव लागणार आहे.
का आराम मिळाल नाही?
शुक्रवारी अहमदाबादमध्ये ही मॅच होईल. क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केल्यानंतर काही तासातच मुंबईची टीम चेन्नईवरुन निघाली. ते सकाळी 5.30 च्या सुमारास अहमदाबादमध्ये दाखल झाले.
विजयानंतर नुसती पळापळ
विजयानंतर अहमदाबादमध्ये पोहोचेपर्यंतचा टीमचा सगळा प्रवास खूप पळापळीचा होता. रात्री 11.15 वाजेपर्यंत मॅच संपली. त्यानंतर खेळाडू 3 वाजता एअरपोर्टवर दिसले. पहाटे 5.30 च्या सुमारास अहमदाबाद एयरपोर्टवर फ्लाइटने लँडिंग केलं.
Mumbai Indians leaving to Ahmedabad from Chennai after victory over LSG#MumbaiIndians #MIvsLSG #RohitSharma #sky #Madhwal #MiPaltan #LSGvsMI #mivsgt #Mumbaindians pic.twitter.com/hJh2fwtWUu
— J (@catpersonaf) May 24, 2023
अजिबात नाही मिळाला वेळ
स्टेडियममध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह, सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा, पीयूष चावलाची पत्नी अनुभूति चौहान उपस्थित होती. मॅचनंतरही त्या टीमसोबत एयरपोर्टवर दिसल्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. कपडे बदलण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. ज्या ड्रेसमध्ये त्या स्टेडियममध्ये दिसल्या होत्या. त्याच ड्रेसमध्ये अहमदाबदाला पोहोचल्या.