IPL 2023 Final : नवऱ्याच्या टीमला सपोर्ट् करण्यासाठी CSK खेळाडूच्या पत्नीने सोडली मोठ्या हुद्दयाची नोकरी
IPL 2023 Final : CSK ने दोघांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात दोघे आपलं रिलेशनशिप आणि परस्पराबद्दलच्या बॉन्डबद्दल बोलताना दिसतायत. चेन्नई सुपर किंग्सला IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याची महत्वाची भूमिका आहे.
अहमदाबाद : IPL 2023 च्या सीजनमध्ये आतापर्यंत त्याने दमदार कामगिरी केलीय. आज फायनलमध्येही त्याने तोच फॉर्म कायम ठेवावा, अशीच तमाम CSK च्या फॅन्सची अपेक्षा असेल. T 20 क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आडवे-तिडवे शॉट मारुन धावा वसूल केल्या जातात. पण त्याच्या बॅटिंगमध्ये क्रिकेटिंग शॉट्स दिसतात. बॅटिंगमध्ये एक क्लास दिसतो. तोच खेळ आज फायनलच्या सामन्यात त्याच्याकडून एमएस धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांना अपेक्षित आहे.
सीएसकेसाठी या प्लेयरने डावाच्या सुरुवातीलाच पाया रचण्याच काम केलय. या खेळाडूने चेन्नई सुपर किंग्सला IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका आहे.
चेन्नईचा हा प्लेयर कोण?
हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून त्याचं नाव आहे डेवॉन कॉनवे. ऑन फिल्ड असो, वा ऑफ फिल्ड डेवॉन कॉनवेची जोडीदार पाहून तुम्ही हेच म्हणाल, जोडी असावी तर अशी. डेवॉन कॉनवेचा ऑन फिल्ड जोडीदार आहे, ऋतुराज गायकवाड. ऋतुराजसोबत कॉनवे मैदानात धावांचा पाऊस पाडतोय. त्याच्या ऑफ फिल्ड जोडीदाराच नाव आहे, किम कॉनवे. ही आहे त्याची पत्नी.
लग्न कधी झालं?
किम कॉनवेने IPL मध्ये खेळणारा नवरा आणि त्याची टीम CSK ला सपोर्ट् करण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. IPL या नवरा-बायकोच्या जोडीसाठी खूप खास आहे. भारतातील या लीगशी डेवॉन कॉनवेच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मागच्यावर्षी IPL दरम्यानच डेवॉन कॉनवेच लग्न झालं होतं. चेन्नई सुपर किंग्सने त्याच सेलिब्रेशन सुद्धा केलं होतं.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये दोघांनी काय म्हटलय?
विवाह बंधनात अडकण्याआधी किम आणि डेवॉन कॉनवेने बराचकाळ परस्परांना डेट केलय. आता दोघांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालय. IPL 2023 च्या फायनलआधी CSK ने डेवॉन कॉनवे आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडिओ रिलीज केलाय. यात दोघे परस्परांसोबतच नातं आणि बॉन्ड बद्दल बोलताना दिसतायत. CSK खेळाडूची पत्नी कुठल्या पदावर होती?
या व्हिडिओमध्ये एक छोटीशी क्लिप आहे, ज्यात डेवॉन कॉनवेची बायको किम IPL साठी भारतात येण्यासाठी तिने काय केलं? ते सांगितलय. किमने सांगितलं की, ती IT कंपनीत मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर कार्यरत होती. नवऱ्याला सपोर्ट् करण्यासाठी भारतात यायच होतं, म्हणून तिने नोकरीचा राजीनामा दिला.