WTC Final 2023 आधी टीम इंडियाच टेन्शन थोडं कमी झालं, एक चांगली बातमी

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या फायनलआधी टीम इंडियासाठी एक गुड न्यूज आहे. टीम इंडियाला मागच्या काही वर्षात आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

WTC Final 2023 आधी टीम इंडियाच टेन्शन थोडं कमी झालं, एक चांगली बातमी
wtc team india
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 10:23 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग सुरु असताना BCCI च्या डोळ्यासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे. WTC फायनलसाठी खेळाडूंना फिट ठेवण्यावर बीसीसीआयचा भर आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंवर बीसीसीआयच बारीक लक्ष आहे. येत्या 7 ते 13 जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. टीम इंडियाला मागच्या काही वर्षात आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

WTC फायनलसाठी आधीच टीम सुद्धा निवडण्यात आली आहे. 23-24 मे पर्यंत हेड कोच राहुल द्रविड आणि काही खेळाडू WTC फायनलच्या तयारीसाठी इंग्लंडला रवाना होऊ शकतात.

दोघे फिट

दरम्यान WTC फायनलआधी टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंपैकी दोघे फिट आहेत. उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर WTC फायनलसाठी उपलब्ध असणार आहेत. उमेशला हॅमस्ट्रिंगची दुखापत झालीय. दुखापत फार गंभीर नाहीय. बीसीसीआयची मेडीकल टीम कोलकाता नाइट रायडर्स मेडीकल टीमच्या संपर्कात आहे. त्यांच उमशेच्या दुखापतीवर लक्ष आहे.

तर 23 मे रोजी, दुसऱ्या खेळाडूची निवड

दुसऱ्या बाजूला शार्दुल ठाकूर देखील फिट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता थोडी कमी झाली आहे. दुसऱ्याबाजूला बीसीसीआय जयदेव उनाडकटबाबत थोडी वाट पाहणार आहे. जर तो दुखापतीमधून सावरला नाही, तर 23 मे रोजी त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूची निवड जाहीर करण्यात येईल.

अख्ख्या सीजनमधून बाहेर

जयदेव उनाडकटला खांद्याची दुखापत झालीय. तो आयपीएल 2023 च्या अख्ख्या सीजनमधून बाहेर गेलाय. WTC फायनलसाठी आता महिना बाकी आहे. सिलेक्टर्स जयदेव उनाडकटच्या जागी दुसऱ्या खेळाडूच नाव जाहीर करण्याची घाई करणार नाहीत. NCA केकेआरचे बॉलिंग कोच भारत अरुण यांच्या संपर्कात आहे. ते 2021 T20 वर्ल्ड कपपर्यंत भारताचे बॉलिंग कोच होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.