मुंबई: डिसेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) इतिहास रचला होता. त्याने एका डावात भारताच्या 10 विकेट घेतल्या होत्या. इतकी अव्वल दर्जाची कामगिरी करुनही, न्यूझीलंडने आता मायदेशात होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून एजाज पटेलला डच्चू दिला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेणारा एजाज तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याने दोन्ही डावात 67 षटकं गोलंदाजी करुन एकूण 14 विकेट घेतल्या होत्या.
भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अष्टपैलू राचिन रविंद्रनेही लक्ष वेधून घेतले होते. आता 13 सदस्यीय संघात राचिन रविंद्रच्या रुपाने न्यूझीलंडकडे फिरकीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. न्यूझीलंडमध्ये ही कसोटी मालिका होणार आहे.
केन विलियमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान केनच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळता आले नाही. दुखापतीमुळे केन दीर्घकाळासाठी संघाबाहेर राहू शकतो, त्याच्यावर शस्त्रक्रियाही होऊ शकते, असे न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी म्हटले होते.
दुसऱ्या कसोटीत दहा विकेट घेणाऱ्या एजाज पटेलचं वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात कौतुक केलं होतं. कर्णधार विराट कोहली, हेड कोच राहुल द्रविड यांनी न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एजाजचं कौतुक केलं होतं. न्यूझीलंडमधील वातावरण, परिस्थिती लक्षात घेऊन एजाजचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
संबंधित बातम्या:
आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य
VIDEO: हिंमत असेल तर अविश्वास ठरावा आणाच, तुमच्यासोबत कोण ते तरी कळेल?; नवाब मलिकांचा टोला
भेटीत तृष्टता मोठी…कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!