मोठी बातमी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी टेस्ट सुरु असताना BCCI ने आपल्याच माणसावर घेतली मोठी Action

दिल्लीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु असताना BCCI ने आपल्याच माणसाविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घडामोडी घडलीय.

मोठी बातमी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी टेस्ट सुरु असताना BCCI ने आपल्याच माणसावर घेतली मोठी Action
bcci Image Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 11:37 AM

मुंबई : दिल्लीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु असताना BCCI ने आपल्याच माणसाविरोधात मोठी कारवाई केली आहे. टीम इंडियाचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांना अखेर आपलं पद गमवाव लागलं आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेऱ्यासमोर केलेले गौप्यस्फोट त्यांना चांगलेच महाग पडले आहेत. शुक्रवारी चेतन शर्मा यांनी चीफ सिलेक्टर पदाचा राजीनाना दिला. बीसीआयच सचिव जय शाह यांना चेतन शर्मा यांनी राजीनामा पाठवून दिला. हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आलय. त्यांची नोकरी धोक्यात असल्याची चर्चा होती. अखेर तेच घडलय. चेतन शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिलाय.

धक्कादायक गोष्टी उघड केल्याने नोकरी गेली?

चेतन शर्मा यांची मागच्याच महिन्यात सीनियर सिलेक्शन कमिटीच्या प्रमुखपदी निवड झाली होती. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने खराब प्रदर्शन केलं. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला. त्यानंतर संपूर्ण निवड समिती बर्खास्त करण्यात आली. चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय खेळाडूंच्या फिटनेसबद्दल अनेक दावे करण्यात आले होते. बोर्ड आणि विराट कोहलीच्या मुद्यावरही खुलासा करण्यात आला होता. या गोष्टी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

जय शाह यांच्या निर्णयाकडे होती नजर मागच्या दोन दिवसांपासून चेतन शर्मा चर्चेत होते. प्रत्येकाच जय शाह काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं होतं. राष्ट्रीय निवडकर्त्यांचा बोर्डाशी करार असतो. त्याअंतर्गत त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नसते. चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशनमधील आरोप

अनफिट खेळाडू फिट दिसण्यासाठी फेक इंजेक्शन घेतात.

पेन किलर इंजेक्शन घेत नाही कारण त्यासाठी डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन लागते. तसेच डोपिंगमध्ये पकडले जाऊ शकतात.

डॉक्टरांना बोलवून इंजेक्शन घेतात. यामुळे डोप टेस्टमध्ये पडकले जाऊ शकत नाही.

जसप्रीत बुमराह झालेली जखम मोठी आहे. एक सामना आणखी खेळला असता तर पूर्ण वर्षभरासाठी बाहेर गेला असता.

प्रत्येक खेळाडूला संघाबाहेर जाण्याची भीती सतावत आहे. यासाठी इंजेक्शन लावून फीट राहतात.

कोणताही खेळाडू संघातील स्थान सोडू इच्छित नाही. यासाठी इंजेक्शन घेऊन स्वत:ला फीट ठेवतात. संजू सॅमसंगबाबत सिलेक्टर्स दबावात आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.