IPL 2021 : मॉर्गनसोबतच्या वादावर आर. अश्विनचं सडेतोड उत्तर, टीकाकारांची पोलखोल करत केली बोलती बंद
दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) दिग्गज खेळाडू आर. अश्विनने त्या सर्वांना सडेतोड उत्तरं दिली आहेत, ज्यांनी त्याच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दुबई : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) दिग्गज खेळाडू आर. अश्विनने त्या सर्वांना सडेतोड उत्तरं दिली आहेत, ज्यांनी त्याच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बुधवारी केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान, आर अश्विनने ओव्हर थ्रोवर घेतलेली धाव वादग्रस्त ठरली. केकेआरचा कर्णधार ऑईन मॉर्गननेही यासाठी अश्विनला लक्ष्य केले होते. मात्र, आता अश्विनने पुढे येऊन प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्याचवेळी हे स्पष्ट केले आहे की, आपण कोणतीही चूक केलेली नाही. (Am I a disgrace like Morgan said I was?: Ashwin answers in six-tweet thread, slams KKR captain and Tim Southee)
राहुल त्रिपाठीने दिल्लीच्या फलंदाजीच्या वेळी 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर थ्रो केला आणि चेंडू दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला लागून दूर गेला. त्यानंतर अश्विनने दुसऱ्या टोकाहून धावून अतिरिक्त धाव चोरण्याचा प्रयत्न केला. केकेआरच्या खेळाडूंना हे आवडले नाही. त्यांना वाटते की हे, खेळभावनेच्या विरुद्ध आहे. अश्विन आऊट झाल्यानंतर पव्हेलियनकडे परत जात असतानाही टीम साऊदीशी त्याचा वाद झाला.
आर. अश्विनने दिलं उत्तर
सामन्यानंतर मॉर्गनने ट्वीट केले, ‘मी जे पाहात आहे, त्यावर माझा विश्वास बसत नाही. लहान मुलांसाठी आयपीएल हे एक भयानक उदाहरण आहे. मला वाटते की, जेव्हा वेळ येईल तेव्हा अश्विनला पश्चाताप होईल. मात्र, आता आर अश्विनने मॉर्गनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आर अश्विनने मोठं ट्विट करत या सर्वांना उत्तर दिली आहेत.
1. I turned to run the moment I saw the fielder throw and dint know the ball had hit Rishabh. 2. Will I run if I see it!? Of course I will and I am allowed to. 3. Am I a disgrace like Morgan said I was? Of course NOT.
— Mask up and take your vaccine???? (@ashwinravi99) September 30, 2021
काय म्हटलंय ट्विटमध्ये
-
- ‘क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला आहे हे पाहताच मी धाव घेण्यासाठी धावलो, पण चेंडू रिषभला लागल्याचे मला माहीत नव्हते.
- मी पाहिले असते तर मी धावलो असतो का? होय, मी धाव मिळवण्यासाठी धावलो असतो आणि मला त्याची परवानगी आहे.
- मॉर्गन म्हणतोय म्हणून मी वाईट ठरतो का?, नाही, असं बिलकूल नाही.
- मी भांडलोय का? नाही! मी स्वतःसाठी उभा राहिलो. माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी मला जे शिकवले ते मी केले. आपण आपल्या मुलांना स्वतःसाठी उभे राहण्यास शिकवले पाहिजे. मॉर्गन आणि साऊदीच्या क्रिकेट विश्वात ते हवं त्याला योग्य किंवा अयोग्य ठरवू शकतात, परंतु तत्त्वांबद्दल बोलताना त्यांना चुकीचे शब्द वापरण्याचा अधिकार नाही. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोक त्यावर चर्चा करत आहेत आणि काय बरोबर आणि काय चूक हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
- अश्विनने पुढे लिहिले की, ‘अनेक खेळाडू या खेळाशी संबंधित आहेत जे हा महान खेळ खेळत आहेत. आणि हा खेळ खेळून आपले करिअर घडवतात. त्यांना शिकवा की, खराब थ्रो जो तुम्हाला बाद करण्यासाठी फेकला आहे, त्यावर धाव घेऊन तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. त्यांना असे सांगून गोंधळात टाकू नका की, जर तुम्ही धावा घेण्यास नकार दिला किंवा नॉर्न स्ट्रायकरला चेतावणी दिली तर तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हाल, कारण जे लोक तुम्हाला चांगले किंवा वाईट ठरवत आहेत, किंवा चांगलं-वाईट शिकवत आहेत ते सर्वजण या खेळाद्वारे त्यांचं घर चालवत आहेत. यशस्वी होण्यासाठी सर्वकाही करत आहेत. मैदानावर खेळताना तुमचं सर्वकाही द्या आणि नियमांचे पालन करा. सामना संपल्यावर हात हलवा. माझ्या मते हा खेळाचा आत्मा आहे, हीच खेळभावना आहे.
right to take a moral high ground and use words that are derogatory.
What’s even more surprising is the fact that people are discussing this and also trying to talk about who is the good and bad person here!
To all the ‘Cricket is a gentleman’s game’ fans in the house’:⬇️⬇️⬇️
— Mask up and take your vaccine???? (@ashwinravi99) September 30, 2021
Do not confuse them by telling them that you will be termed a good person if you refuse the run or warn the non striker, because all these people who are terming you good or bad have already made a living or they are doing what it takes to be successful elsewhere.
— Mask up and take your vaccine???? (@ashwinravi99) September 30, 2021
इतर बातम्या
पुजारा-रहाणेच्या विराटविरोधातील तक्रारीबाबत BCCI ने मौन सोडलं, संपूर्ण प्रकरणावर भाष्य
IPL 2021 : 2015 नंतर पहिल्यांदाच विराट ‘असा’ झाला बाद, युवा खेळाडूच्या चपळाईसमोर कोहली हतबल
IPL 2021 RCB vs RR : विराटसेनेची 4 बलस्थानं, ज्यांच्या जोरावर राजस्थानला केलं चितपट
(Am I a disgrace like Morgan said I was?: Ashwin answers in six-tweet thread, slams KKR captain and Tim Southee)