विराट-नवीन उल हक आणि गौतम गंभीरमधील वादाबाबात अमित मिश्राचा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं ते सांगितलं?

आयपीएल 2023 स्पर्धेत गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद कोणीच विसरू शकत नाही. दिग्गज खेळाडू आमनेसामने आल्याने बरंच काही घडलं होतं. मात्र 2024 स्पर्धेत हा वाद शमला. पण नेमकं तेव्हा काय झालं याबाबत कोणालाच स्पष्ट माहिती नाही. या घटनेचा साक्षीदार असलेल्या अमित मिश्राने अखेर तेव्हा नेमकं काय झालं ते सांगितलं.

विराट-नवीन उल हक आणि गौतम गंभीरमधील वादाबाबात अमित मिश्राचा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं ते सांगितलं?
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 7:12 PM

गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाला आहे. तसेच दिग्गज खेळाडू विराट कोहली त्याच्या प्रशिक्षणात मैदानात उतरणार आहे. अशात या दोघांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसं पाहिलं तर 2024 स्पर्धेत या दोघांमधील वाद संपुष्टात आला असून त्यावर पडदा पडला आहे. पण आता अमित मिश्राने नेमकं हा वाद कसा सुरु झाला आणि काय झालं ते सांगितलं आहे. “बंगळुरुमध्ये आम्ही सामना खेळत होतो. शेवटच्या षटकात आम्ही सामना जिंकलो. तेव्हा गंभीरने थोडी आक्रमकता दाखवली. हलकी फुलकी. कारण प्रेक्षक खूपच विचित्र पद्धतीने गोंधळ घालत होते. शेवटी आम्ही सामना जिंकलो. तेव्हा गंभीरने सांगितलं की इतका आवाज करू नका. गप्प बसा आम्ही सामना जिंकू. त्या सामन्यातही विराटकडून काहीतर झालं होतं. पण ते प्रकरण तिथेच संपलं.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“लखनौच्या सामन्यात विराट कोहली हे प्रकरण वाढवेल असं वाटलं नव्हतं. पण आम्हाला याबाबत काहीच आक्षेप नव्हता. पण त्याने नंतर आमच्या खेळाडूंना अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. कायल मेयर्ससोबत त्याचा काय वाद होता. त्यालाही बाद झाल्यानंतर उलटसूलट बोलला. नवीन उल हक बॉल टाकत असातना त्याला उलटसूलट बोलला. आणखी काही खेळाडूंना असंच बोललं गेलं. प्रेक्षकांना हात दाखवत होता. ये करत ते करत होता. खूप साऱ्या गोष्टी थांबवू शकत होता. पण विराट कोहलीने तसं केलं नाही.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“मी नवीनसोबत फलंदाजी करत होतो. तेव्हा मी त्याला जाऊन सांगितलं की कोणासोबत बोलत आहेस. तो यंगस्टर आहे. गप्प बस. या सर्व गोष्टी इथेच थांबव. तेव्हा विराट कोहलीने सांगितलं मला काय समजवतो त्या जाऊन समजव. पण तो मला काहीच बोललं नाही. माझ्यासोबत व्यवस्थित बोलला. मी त्याला सांगितलं की तो गप्प उभा आहे आणि तू इथून त्याला बोलत आहेस. तेव्हा कोहली म्हणाला मला नको शिकवू, त्याला जाऊन सांग कसं वागतो ते. ठीक आहे तो तसा वागत असेल. पण तू तर मोठा प्लेयर आहेस. तो तुझ्या जवळपासही नाही. मग वाद का करत आहे, असं मी त्याला सांगितलं.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“सामना संपल्यानंतर विराटने पुन्हा एकदा नवीनला अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. हात मिळवताना सुरुवात झाली. जेव्हा गंभीर आला आणि त्याला याचा राग आला. सामना संपला आहे. तुम्ही जिंकला आहात. मग पुन्हा का सुरुवात केली. का बोलत आहे, असं का वागत आहेस. मग मी गौतमसोबत उभा राहिलो. तेव्हा मलाही राग आला होता.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.