Andrew Symonds Death: सायमंड्सप्रमाणे ‘या’ पाच क्रिकेपटूंचा कार अपघातात मृत्यू, मृतांमध्ये एक टॅलेंटेड युवा भारतीय क्रिकेटपटू

Andrew Symonds Death: अपघातात त्याला बराच मार लागला होता. रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्सप्रमाणे आणखी पाच क्रिकेटपटुंचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

Andrew Symonds Death: सायमंड्सप्रमाणे 'या' पाच क्रिकेपटूंचा कार अपघातात मृत्यू, मृतांमध्ये एक टॅलेंटेड युवा भारतीय क्रिकेटपटू
सायमन्डसच्या खास गोष्टी...Image Credit source: Yahoo Sports
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 12:31 PM

मुंबई: शेन वॉर्न (Shane warne) पाठोपाठ क्रिकेट विश्वाने आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूला गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं (Andrew symonds) काल रात्री कार अपघातात (Car Accident) निधन झालं. क्वीन्सलँड राज्यातील टाउन्सविले येथे त्याच्या कारला अपघात झाला. सायमंड्स 46 वर्षांचा होता. सायमंड्सच्या गाडीने रस्ता सोडल्यामुळे हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. डॉक्टर्सनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण अपघातात त्याला बराच मार लागला होता. रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्सप्रमाणे आणखी पाच क्रिकेटपटुंचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

  1. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू बेन हॉलिऑकचाही मृत्यू रस्ते अपघातात झाला होता. बेन हॉलिऑक अवघ्या 24 वर्षांचा होता. पर्थमध्ये कार चालवत असताना त्याचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं व गाडी थेटे भिंतीला जाऊन धडकली. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्याने इंग्लंडसाठी डेब्यू केला होता. त्याच्या मृत्यून क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली होती. इंग्लंडसाठी तो दोन कसोटी आणि 20 वनडे सामने खेळला होता.
  2. वेस्ट इंडिजचा फलंदाज रुनाको मॉर्टनचाही कार अपघातात मृत्यू झाला होता. तो 33 वर्षांचा होता. रुनाकोची कार त्रिनिदादमध्ये सॉलमॉन हायवेवरील एका खांबाला धडकली होती. रुनाको मॉर्टनने वेस्ट इंडिजसाठी 15 कसोटी, 56 वनडे आणि 7 टी 20 सामने खेळले.
  3. वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर लॉरी विलियम्सचा सुद्धा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जमैकामध्ये त्याची कार समोरुन येणाऱ्या बसला जाऊन धडकली होती. या अपघातात लॉरी विलियम्सचा आणि त्याच्या छोट्या भावाचा मृत्यू झाला होता. लॉरी विलियम्स अवघ्या 33 वर्षांचा होता. लॉरी विलियम्स वेस्ट इंडिजसाठी 15 वनडे सामने खेळला.
  4. ग्लेमॉर्गनसाठी खेळणाऱ्या इंग्लिश क्रिकेटपटू टॉम मायनार्डचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. हा क्रिकेटपटू ड्रग्सच्या नशेत होता. पोलीस त्याचा पाठलाग करत होते. पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी गाडी पळवताना कार ट्यूब ट्रेनला धडकली. ज्यात टॉमचा मृत्यू झाला. टॉम मायनार्डचं वय 23 वर्ष होतं. त्याने 43 फर्स्ट क्लास आणि 63 लिस्ट ए चे सामने खेळले होते.
  5. रस्ते अपघातात एका भारतीय क्रिकेटपटूचाही मृत्यू झाला होता. पंजाबचा फर्स्ट क्लास क्रिकेटर ध्रुव पांडवने 1992 साली रस्ते अपघातात प्राण गमावले. तो 18 वर्षांचा होता. त्याने वयाच्या 13 व्या वर्षीच फर्स्ट क्लासमध्ये डेब्यू केला होता. तो भारताकडून लवकरच खेळेल अशी चर्चा होती. वयाच्या 14 व्या वर्षी जम्मू-काश्मीर विरुद्ध त्याने फर्स्ट क्लासमध्ये शतक झळकावलं होतं. पण 31 जानेवारी 1992 रोजी अंबालाजवळ रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.