ज्याला माकड म्हणाला, त्या भज्जीसोबतच अँड्र्यू सायमंड्स MIसाठी खेळला! मंकीगेट ते दारुचं व्यसन, कसा होता सायमंड्स?

Andrew Symonds Died : अँड्र्यू सायमंड्सच्या कार अपघातात मृत्यू झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय.

ज्याला माकड म्हणाला, त्या भज्जीसोबतच अँड्र्यू सायमंड्स MIसाठी खेळला! मंकीगेट ते दारुचं व्यसन, कसा होता सायमंड्स?
हरभजन सोबतच्या सायमड्सच्या आठवणी...Image Credit source: iplt20.com
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 10:31 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचा कार अपघात (Car Accident) जीव गेला. भीषण कार दुर्घटनेमध्ये त्याला जबर मार लागला. वयाच्या 46 व्या वर्षी अँड्र्यू सायमंड्स यांच्या मृत्यूनं संपूर्ण क्रिकेट विश्व हादरुन गेलंय. महिन्याभरापूर्वी शेन वॉर्नचा मृत्यू झाला होता. त्या धक्कातून आता कुठे ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्व सावरत होत. अशातच आणखी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली. क्विन्सलॅन्डमधील टाऊन्सविलेजवळ अँड्र्यू सायमंड्सची भरधाव कार उलटली. त्यात अँड्र्यू सायमंड्सला जबर मार लागला. गंभीर जखमी झालेल्या अँड्र्यू सायमंड्सचा या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. स्थानिक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. अँड्र्यू सायमंड्सच्या भारतासोबत आठवणी कधीच विसरता येण्यासारख्या नाहीत. हरभजन सिंहसोबत झालेली मंकीगेट कॉन्ट्रोवर्सी (Money Gate Controversy) ही प्रचंड गाजली होती. तेव्हापासून अँड्र्यू सायमंड्स आणि भारतीय क्रिकेट यांच्यातील स्पर्धा चर्चेत आली होती. दरम्यान, नंतर अँड्र्यू सायमंड्स हा आयपीएलमध्येही खेळला. विशेष म्हणजे हरभजन सिंह आणि अँड्र्यू सायमंड्स हे दोघेही आयपीएलमध्ये एकाच सामन्यात खेळले होते. या सगळ्या आठवणी आता अँड्र्यू सायमंड्सच्या जाण्यानं पुन्हा एकदा फ्लॅशबॅकप्रमाणे क्रीडा चाहत्यांना स्मरल्या नाहीत, तरच नवल!

हरभजनसोबत मंकीगेट वाद…

ऑस्ट्रेलियामध्ये हरभजन सिंह यांच्यासोबत एक विचित्र किस्सा घडला होता. अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंह यांच्यावर मोठा वाद झाला होता. वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप अँड्र्यू सायमंड्सने हरभजनवर केला होता.  हरभजन सिंगने आपल्याला माकड म्हटल्याचा आरोप अँड्र्यू सायमंड्सने केला होतं.

क्रिकेट हा खरंतर जेंटलमन्स गेम म्हटला जातो. पण हा वाद क्रिकेटच्या इतिहासातील बराच काळ चर्चेत राहिलेला वाद होता. हरभजन सिंह आणि अँड्र्यू सायमंड्समधील वादाला मंकीगेट असं नाव देण्यात आलं होतं. हा वाद इतका ताणला गेला होता की रिकी पॉँटिंगने या प्रकरणाची तक्रार स्टीव्ह बकनर आणि मार्क बेन्सन यांच्याकडे तर केलीच. शिवाय सिडनी कोर्टातही याप्रकरणी पुढे दाद मागितली गेली होती.

दरम्यान, याप्रकरणी कोणताच पुरावा सापडला नसल्यानं भज्जीवर कोणतीही कारावई झाली नाही. या संपूर्ण वाद घटला होता 2007-2008 च्या भारताच्या सिडनी दौऱ्यानंतर.

नंतर एकत्रही खेळले…

दरम्यान, नंतर हरभजन सिंह आणि एक अँड्र्यू सायमंड्स एकत्रही खेळले. आयपीएलमध्ये तगडी बोली मुंबई इंडियन्सनी अँड्र्यू सायमंड्सवर लावली होती. त्यानंतर हरभजन सिंह आणि अँड्र्यू सायमंड्स एकत्र एकाच संघात खेळताना दिसले होते. अँड्र्यू सायमंड्सला तेव्हा मुंबईच्या संघाकडून भरभरुन प्रेमही देण्यात आलं होतं.

अँड्र्यू सायमंड्सचं दारूचं व्यसन

अँड्र्यू सायमंड्सने आपल्या करिअरमधली शेवटची मॅच खेळली 7 मे 2009 रोजी. दुबीत खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेन्टी सामन्यानंतर अँड्र्यू सायमंड्सनं आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आपल्या दारुच्या व्यसनामुळे तो चर्चेत आला होता. दारु पिण्यामुळे त्याला टी-ट्वेन्टी संघातून डावलण्यात आलेलं. नियम मोडल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.