Chakda Xpress: अनुष्का शर्माने नेटमध्ये करतेय मेहनत, सुरु केला गोलंदाजीचा सराव

बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर चाहत्यांना अभिनेत्री अनुष्का शर्माची (Anushka Sharma) झलक पहायला मिळाली आहे. अनुष्का पुन्हा एकदा स्क्रिनवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

Chakda Xpress: अनुष्का शर्माने नेटमध्ये करतेय मेहनत, सुरु केला गोलंदाजीचा सराव
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:45 PM

मुंबई: बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर चाहत्यांना अभिनेत्री अनुष्का शर्माची (Anushka Sharma) झलक पहायला मिळाली आहे. अनुष्का पुन्हा एकदा स्क्रिनवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी तिने नेटमध्ये कसून सरावही सुरु केला आहे. अनुष्का ‘चाकदा एक्सप्रेस’ (Chakda Express) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने शुक्रवारी नेट प्रॅक्टीसचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ‘चाकदा एक्सप्रेस’ हा भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) आयुष्यावरील चित्रपट आहे. अनुष्का या चित्रपटात स्वत: झुलन गोस्वामीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. झुलन गोस्वामीने आयुष्यात कसा संघर्ष केला? तिने यश कसं मिळवलं? त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. यावर्षाच्या सुरुवातीला अनुष्काने या चित्रपटाची घोषणा केली होती. चाकदा एक्सप्रेसच्या निमित्ताने अनुष्का शर्मा बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर परतणार आहे.

झुलनची गोलंदाजीची स्टाइल, व्यक्तीमत्व हुबेहूब तसंच वाटलं पाहिजे, यासाठी अनुष्का सध्या नेटमध्ये मेहनत घेतेय. तिने त्याचे काही फोटो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनुष्काने चेंडूवर ग्रीप पकडल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत गॉगल घालून ती गोलंदाजी करताना दिसते. ‘ग्रीप बाय ग्रीप’, चाकदा एक्सप्रेसची तयारी असे अनुष्काने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोवर झुलन गोस्वामीने सुद्धा ‘व्हेरी नाइस’ अशी कमेंट केली आहे.

हा खूप खास चित्रपट आहे. ही एक त्यागाची गोष्ट आहे. भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर प्रेरीत होऊन हा चित्रपट बनवण्यात येत आहे. महिला क्रिकेटबद्दल डोळे उघडणारा हा चित्रपट ठरेल असं अनुष्काने चित्रपटाची घोषणा करताना म्हटलं होतं.

Anushka Sharma preps grip by grip for Chakda Xpress pics from practice session Jhulan Goswami

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.