IND vs AUS 5 th20 : अर्शदीप सिंहचे शेवटचे घातक सहा बॉल, कांगारूंचा स्वप्नभंग, वेड चारीमुंड्या चीत

Arshdeep Singh Ind vs aus t20 Last Over : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंहने कमाल केली. गेलेला सामना पठ्ठ्याने जिंकवला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटच्या ओव्हरचा थरार कसा पार पडला जाणून घ्या.

IND vs AUS 5 th20 : अर्शदीप सिंहचे शेवटचे घातक सहा बॉल, कांगारूंचा स्वप्नभंग, वेड चारीमुंड्या चीत
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 3:56 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये कांगारू सहा धावांनी पराभूत झाले. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वात भारताने 4-1 ने टी-20मालिका जिंकली. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये भारताच्या अर्शदीप सिंहने घातक मारा करत सामना भारताच्या पारड्यात झुकवला. एकवेळ अशी होती का भारत पूर्णपणे पिछाडीवर पडला होता. कांगारूंच्या मोक्याच्या वेळी विकेट गेल्या आणि भारताने ऑस्ट्रेलियाला मालिकेचा शेवट गोड करून दिला नाही. शेवटच्या ओव्हरमधील थरार, वाचा सविस्तार.

शेवटच्या ओव्हरमधील ओव्हर

ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. मात्र कांगारूंच्या संघाचा कॅप्टन मॅथ्यू वेड मैदानात असल्याने त्याच्याासाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. मात्र युवा अर्शदीप सिंहने टिच्चून मारा केला, पहिला बॉल बाऊन्सर टाकला होता जो वेड मारण्यात यशस्वी ठरला नाही. त्याने वाईड असल्याची पंचांकडे मागणी केली परंतु ती फेटाळली. दुसरा बॉल अर्शदीपने एक कडक यॉर्कर टाकला त्यावरही एकसुद्धा धाव निघाली नाही. तिसरा बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात वेड कॅच आऊट झाला.

चौथ्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने एक धाव घेतली. त्यानंतर पाचवा बॉल अर्शदीपच्या हाताला लागून पंचांना लागला. त्यामुळे चौकार अडला गेला आणि त्यावरही एकच धाव निघाली.  सहाव्या बॉलवर म्हणजेच शेवटच्या बॉलवर 8 धावांची गरज होती. त्यावरही अर्शदीपने एकच धाव दिली. आपल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त तीन धावा दिल्या.

दरम्यान, भारताने प्रथम फंलदाजी करताना 160-8 धावा केल्या होत्या. कांगारूंच्या संघाला जिंकण्यासाठी 161 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठालाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 20 ओव्हरमध्ये 154-8 धावा करू शकला. भारताने शेवटचा सामनाही जिंकत मालिका 4-1 ने जिंकली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.