Arun lal marriage: 38 वर्षाच्या बुलबुलने 66 वर्षाच्या अरुण लाल यांच्यात असं काय बघितलं? कशी प्रेमात पडली? जाणून घ्या Love Story

Arun lal marriage: सेंट्रल कोलकातामधील एका शाळेत ती मागच्या साडेआठ वर्षांपासून शिक्षिका म्हणून काम करत आहे. मागच्या काही महिन्यांपासून अरुण लाल आणि बुलबुल परस्परांना डेट करत होते.

Arun lal marriage: 38 वर्षाच्या बुलबुलने 66 वर्षाच्या अरुण लाल यांच्यात असं काय बघितलं? कशी प्रेमात पडली? जाणून घ्या Love Story
Arun lal-bulbul saha Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 4:23 PM

मुंबई: भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल (Arun Lal Marriage) काल कोलकात्यात विवाहबंधनात अडकले. त्यांच्या या लग्नाची सोशल मीडियावर (Social Media) बरीच चर्चा आहे. कारण, अरुण लाल आणि बुलबुल (Bulbul saha) यांच्या वयामधलं अंतर तसच अरुण लाल यांचं पहिलं लग्न झालं आहे. त्यामुळे त्याच्या विवाहाची चर्चा होणं, स्वाभाविक आहे. हॉटेल पीयरलेस मध्ये सोमवारी रात्री रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. 38 वर्षांची बुलबुल तिच्यापेक्षा वयाने 28 वर्षांनी मोठ्या असलेल्या अरुण लाल यांच्या प्रेमात कशी पडली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बुलबुलने बॉलिवूडशादी बरोबर बोलताना तिच्या लव्हस्टोरी बद्दल खुलासा केला आहे. अरुण लाल यांच्या बरोबर पहिली भेट कधी झाली ते ती त्यांच्या प्रेमात कशी पडली? या बद्दल बुलबुलने सांगितंल.

पहिली भेट कधी झाली?

बुलबुल साहा पेशाने एक शिक्षिका आहे. सेंट्रल कोलकातामधील एका शाळेत ती मागच्या साडेआठ वर्षांपासून शिक्षिका म्हणून काम करत आहे. मागच्या काही महिन्यांपासून अरुण लाल आणि बुलबुल परस्परांना डेट करत होते. दोघांनाही ओळखणाऱ्या एका मित्रामार्फत अरुण लाल यांच्या बरोबर पहिली भेट झाल्याचं बुलबुलने सांगितलं. ते एका कॉमन मित्राच्या पार्टीला गेले होते. तिथे ओळख झाली. तिथे त्यांच्यात बोलणं सुरु झालं. त्यानंतर परस्परांबद्दल भावना निर्माण झाल्या.

अरुण लाल यांच्याबद्दल काय भावलं?

अरुण लाल यांच्याबद्दलची एक छोटीशी आठवण तिने सांगितली. त्यामुळे अरुण लाल तिला जास्त भावले. “पहिल्या नजरेत आम्हाला प्रेम झालं नाही. पण लवकर आम्ही परस्परांच्या प्रेमात पडलो. अरुण लाल चांगल्या मनाचा एक दयाळू माणूस आहे. निर्सग, प्राणी आणि गरीबांबद्दल त्यांना आत्मियता आहे. समजा अरुण लाल त्यांच्या कारमध्ये असतील आणि त्यांच्याकडे पैसे नसतील आणि एखादा भिखारी समोर आला, तर ते माझ्याकडून पैसे घेऊन त्याला देतील. दुसऱ्यांबद्दल त्यांना सहानुभूती आहे. हेच त्यांचे गुण विशेष भावले” असं बुलबुल साहाने सांगितलं.

बुलबुलला कशात रुची आहे?

बुलबुलला जेवण बनवायला भरपूर आवडतं. तिने 2019 मध्ये एका कुकिंग स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. अरुण लाल भारतासाठी 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत 6 अर्धशतकरांसह 729 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये एका अर्धशतकासह 122 धावा केल्या आहेत.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.