IPL 2023 : विश्वास नाही बसणार, ‘महाराष्ट्राच्या बजेटपेक्षा IPL मधील बेटिंगची उलाढाल जास्त’
IPL 2023 Betting : IPL 2023 मधील प्रत्येक मॅचवर लागणार इतक्या हजार कोटींचा सट्टा. डोळे विस्फारतील इतक्या पैशांची बेटिंग आयपीएलमध्ये होऊ शकते. पोलिसांनी त्याआधीच मुसक्या आवळल्या आहेत.
IPL 2023 Betting : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला उद्यापासून सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना होणार आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या उत्सवाला एकदिवसाचा अवधी उरला आहे. आयपीएलमध्ये क्रिकेट रसिक खेळाचा आनंद लुटतातच. पण त्याचबरोबर इथे सट्टेबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. बुकी आणि मॅच फिक्सर्सची आयपीएलच्या प्रत्येक सामन्यातून दरदिवशी 600 कोटी रुपये प्रॉफिट कमावण्याची योजना आहे.
दुबई आणि कराचीमध्ये आंतरराष्ट्रीय बेटिंग रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटच्या संपर्कात असलेल्या बुकिंनी आयपीएलसाठी सट्टेबाजी सुरु केलीय. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
आंतरराज्य इंटरनेट बेटिंग रिंगचा छडा
आयपीएलमध्ये सट्ट्यासाठी पैसा घेणारे 18 क्रिकेट बेटिंग APP आणि 60 बुक मेकर्सना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधून काढलय. मागच्यावर्षी इंग्लंड-पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलवेळी दादरमधील हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला आंतरराज्य इंटरनेट बेटिंग रिंगचा छडा लागला.
3500 कोटींची उलाढाल
“महाराष्ट्र राज्याच्या बजेटपेक्षा आयपीएल क्रिकेट बेटिंगची उलाढाल जास्त आहे. प्रत्येक सेशनमध्ये प्रति सामना 3500 कोटींची उलाढाल होणार आहे. IPL 2023 च्या 16 व्या सीजनमध्ये 74 सामने आहेत. 10 टीम्स प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत” असं माजी क्रिकेट प्रशासकाने फ्रि प्रेस जर्नलशी बोलताना सांगितलं. कशावर बेटिंग होते?
सर्वाधिक धावा, बाऊंड्री, विकेट आणि खेळाडूची व्यक्तीगत कामगिरी कशी असेल, त्यासाठी सुद्धा बेट स्वीकारली जाते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची डी गँग या बेटिंग रॅकेटमध्ये आहे. मनोज मेट्रो, विशाल चेंबूर, श्रेयांश, योगी ठाणा, शेहनाज घाटकोपर, मेहुल सीपी टँक, धवल लालबाग, सोनू झालान, लक्ष्मीचंद ठाणा, महादेव, केतन ए टू झेड, अशी या बुकिंची नाव आहेत.