Ashes Series 1st Test 1st Day Stumps | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीतील पहिल्या दिवसाचा ‘गेम ओव्हर’
England vs Australia 1st Test 1st Day | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. जाणून घ्या पहिल्या दिवशी काय काय झालं?
बर्मिंगघम | अॅशेस सीरिज 2023 मधील पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोवर 4 ओव्हरमध्ये बिनबाद 14 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही सलामी जोडी नाबाद परतली. वॉर्नर याने 8 आणि ख्वाजाने नाबाद 4 रन्स केल्या. ऑस्ट्रेलिया अजून 379 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान त्याआधी इंग्लंड पहिला डाव 393 धावांवर घोषित केला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक नजर असणार आहे. दरम्यान आपण पहिल्या दिवशी काय काय झालं, हे जाणून घेऊयात.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला
Stumps at Edgbaston ?
हे सुद्धा वाचाAustralia see off the tricky period without suffering any damage ?#Ashes | #WTC25 | ?: https://t.co/ZNnKIn9jeq pic.twitter.com/x1QD9lftc7
— ICC (@ICC) June 16, 2023
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 78 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 393 रन्सवर इनिंग डिक्लेअर केल्याने क्रिकेट चाहत्यांना एकच झटका लागला. इंग्लंडकडून जो रुट याने सर्वाधिक 118 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने 4 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडकडून झॅक क्रॉली याने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली. डकेट 12 धावांवर आऊट झाला. ओली पोप 31 धावांवर नेथन लायनचा शिकार झाला. हॅरी ब्रूकने 32 धावा जोडल्या. कॅप्टन बेन स्टोक्स सपशेल अपयशी ठरली. स्टोक्स अवघी 1 धाव करुन बाद झाला. विकेटीकीपर बॅट्समन जॉनी बेयरस्टो याने 78 धावांचं योगदान दिलं. निवृत्तीवरुन माघार घेतल्या मोईन अली 18 रन्स करुन तंबूत परतला. स्टुअर्ट ब्रॉडने 16 रन्स केल्या. तर रॉबिन्सन याने 17 धावांची नाबाद खेळी केली.
इंग्लंडकडून जो रुट याने 152 बॉलमध्ये 7 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 118 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. रुटचं हे कसोटीतील 30 वं शतक ठरलं.
जो रुटचं शतक
Ben Stokes has DECLARED!
We end our first innings on 3️⃣9️⃣3️⃣ with Joe Root unbeaten on 118*.
Let's have a crack at the Aussies! ? pic.twitter.com/A8rjIz2Mhf
— England Cricket (@englandcricket) June 16, 2023
तसेच ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याच्या 4 विकेट्स व्यतिरिक्त जोश हेझलवूड याने 2 तर बोलँड आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कशाप्रकारे सामना करते, याकडे क्रिकेट विश्वाचं बारीक लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.