AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अहो काय तुम्ही पण… अश्विन चुकताच त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, पाहा Highlights Video

आर अश्विनमुळे हा घोळ झाला आणि मौदानावरील हा प्रकार पाहून त्याची पत्नी प्रिथी नारायणन हिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसून आले.

Video : अहो काय तुम्ही पण... अश्विन चुकताच त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, पाहा Highlights Video
अश्विन चुकताच त्याच्या पत्नीची रिअ‍ॅक्शनImage Credit source: twitter
| Updated on: May 15, 2022 | 10:31 PM
Share

मुंबई : राजस्थान रॉयल्सनं (RR) आयपीएल (IPL 2022) च्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी पहिले केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर 6 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. यशस्वीनं 29 चेंडूत 46 धावा, कर्णधार संजू सॅमसनने 24 चेंडूत 32 धावा केल्या. पडिकलने 18 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली. पराग 17 धावा करू शकला. नीशमने 14 धावा केल्या. बोल्ट सतरा धावांवर नाबाद राहिला. लखनौचे 12 सामन्यांतून 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. या सामन्यातील विजय लखनौला प्लेऑफमध्ये घेऊन जाईल, तर पराभव झाल्यास त्यांना शेवटचा सामना पुन्हा जिंकावा लागेल. रॉयल्सच्या संघानेही विजयाची नोंद केली, तर ते अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतील. दरम्यान, या सामन्यात अश्विननं एक चुक केलीय.

इनिंग ब्रेक

अहो काय तुम्ही पण….

अठराव्या षटकात एक गडबड झाल्याच पहायला मिळालं. जिमी निशॅमला रनआऊट होऊन माघारी जावे लागले. आर अश्विनमुळे हा घोळ झाला आणि मौदानावरील हा प्रकार पाहून त्याची पत्नी प्रिथी नारायणन हिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसून आले.

अश्विनच्या पत्नीची रिअ‍ॅक्शन, Video पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आवेशची वेगवान गोलंदाजी

आवेशने बळीचा बकरा बनवताना त्रिफळा उडवला. राजस्थानचा स्फोटक सलामीवीर जोस बटलरलाही या सामन्यात काही आश्चर्यकारक करता आले नाही आणि तो स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेशने बटलरला बोल्ड केलं. बटलर सहा चेंडूत केवळ दोन धावा करू शकला. यावेळी आवेशच्या चांगलीच चर्चा रंगली.

आवेशची जोरदार गोलंदाजी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जिमी नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, आवेश खान, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.