Asia Cup 2022 : ब्रेकनंतर कोहली एकदम फ्रेश, महिनाभराच्या विश्रांतीनंतर विराटकडून आशा वाढल्या, रोहित शर्मानं दिली फॉर्मबद्दल अपडेट
Asia Cup 2022 : आशिया चषकात विराट कोहलीत्या चाहत्यांना त्याच्या मैदानातील फटकेबाजीची आणि षटकारांसह चौकार पाहण्याची आशा आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीही उत्साहात आहेत.
मुंबई : आता बास! असं म्हणण्याची वेळ विराट कोहली याच्या चाहत्यांवर आयपीएलमध्ये (IPL 2022) आली होती. आता विराट कोहलीत्या चाहत्यांना त्याच्याकडून आशिया चषकात (Asia Cup 2022) त्याच्या मैदानातील फटकेबाजीची आणि षटकारांसह चौकार पाहण्याची आशा आहे. भारताचा (India) पहिला सामना पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. या शानदार आणि बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानं विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल काही सांगितलंय. तुम्ही म्हणाल आता आम्हाला त्याच्या चांगल्या कामगिरीची आशा असताना रोहित नेमकं काय म्हणटलंय. कारण, विराट कोहली हा मागच्या काही दिवसांपासून टीकेचा बळी ठरला आहे. आयपीएलमधील विराटची सुमार कामगिरी त्याच्या टीकेचं कारण बनली होती. यानंतर विराटवर त्याचे चाहतेही नाराज असल्याचं दिसून आलं. यंदा मात्र विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
फटकेबाजी कधी दिसणार?
कोहली त्याच्या रंगात दिसावा, त्याची मैदानातील फटकेबाजी दिसावी, असं त्याच्या क्रिकेटप्रेमींना वाटणारच. कोहली स्वतः पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल. आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने कोहलीच्या फॉर्मबद्दल मोठा अपडेट दिला.
रोहित शर्मा काय म्हणाला?
भारत आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. सामन्यापूर्वी संघ जोरदार सराव करत आहेत. सराव सत्रादरम्यान कोहली चांगल्या लयीत दिसला. रोहितने रविवारी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कोहलीबद्दल अपडेट दिला. त्यानं सांगितले की, ब्रेकनंतर कोहली एकदम फ्रेश दिसत आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ‘मी कोहलीला फलंदाजी करताना पाहिलं आणि तो चांगल्या लयीत दिसत होता. त्याला पाहून मला आनंद झाला. तो खूप मेहनत घेत आहे. तो फारसा विचार करत नाही असे दिसते. तो जसा होता तसा दिसतोय.’ आता रोहित शर्माच्या या पत्रकार परिषदेतील माहितीनं विराटच्या चाहत्यांना त्याच्याकडून आशा वाढल्या आहेत.
संभाव्य संघ खालीलप्रमाणे
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दाहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.