IND vs BAN Weather Report | टीम इंडिया-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द होणार?
Asia Cup 2023 India vs Bangladesh Weather Report | आशिया कप 2023 स्पर्धेच्या साखळी आणि आता सुपर 4 फेरीतील अनेक सामन्यांदरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला.
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील अखेरचा आणि सहावा सामना हा शु्क्रवारी 15 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या सामन्याचं आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाने सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलंय. मात्र त्यापुढेही या सामन्यात अनेक रेकॉर्ड होऊ शकतात. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा नाही, असं म्हणून चालणार नाही. मात्र या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.
सामन्यादरम्यान कसं असेल हवामान?
एक्युवेदर या वेबसाईटनुसार, शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी कोलंबोत पाऊस होण्याची 88 टक्के शक्यता आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोलंबोत सकाळपासून पावसाचा अंदाज आहे. सामना 3 वाजता सुरु होणार आहे. या दरम्यान पावसाची 39 टक्के शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता पाऊस हजेरी लावणार याबाबत 61 टक्के शक्यता आहे. संध्याकाळी पावसाची 61 टक्के तर त्यानंतर 50 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यातील काही ओव्हर कमी होऊ शकतात. तसेच सामना रद्दही केला जाऊ शकतो.
आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.