AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 ला गालबोट, भर सामन्यात श्रीलंका-बांगलादेशचे खेळाडू एकमेकांना भिडले, पाहा Video

Srilanka vs Bangladesh Controversy video : आशिया कपमधील दुसऱ्या श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस यांच्यात वाद झाला.

Asia Cup 2023 ला गालबोट, भर सामन्यात श्रीलंका-बांगलादेशचे खेळाडू एकमेकांना भिडले, पाहा Video
| Updated on: Sep 01, 2023 | 4:31 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 चा दुसरा सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यामध्ये श्रीलंका संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामने पाहायला मिळतात. श्रीलंका संघाने एकहाती सामना जिंकत स्पर्धेची सुरूवात केलीये. गतविजेत्या श्रीलंका संघाचे मुख्य खेळाडू दुखापीतमुळे आशिया कपला मुकले असले तरीसुद्धा संघाने झकास सुरूवात केली आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. नागीन डान्स सर्वांना माहित आहे,  दोन्ही संघांमध्ये तेव्हापासून टसल पाहायला मिळते. कालच्या सामन्यात नेमकं काय झालं की दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले.

पाहा व्हिडीओ-

बांगलादेश संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना 164 धावांवर आटोपला. त्यानंतर श्रीलंकेचा संघ बॅटींग करत असताना चौथ्या ओव्हरमध्ये किस्सा झाला. बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस यांच्यात वाद झाला.

बांगलादेशचा गोलंदाजा शरीफुल इस्लाम याने बॉस टाकल्यावर कीपरला काहीतरी बोललेला. मात्र कुसल मेंडिसला वाटलं तो त्यालाच काहीतरी बोलला तेव्हा या गैरसमजातून दोघे आमने-सामने आले. दोघे एकमेकांना भिडणार तेवढ्यात पंचांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यावेळी बांगलादेशचे इतर खेळाडूही जमा झालेले. मात्र पंचांनी वाद जास्त वाढू न देता तिथेच मिटवला.

बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.