IND vs PAK : आता काय झालं? पाकिस्तानविरूद्धच्या मॅचआधी टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू परतला घरी

Ind vs Pak Asia Cup : टीम इंडियाचा पाकिस्तानविरूद्ध सामना असताना स्टार खेळाडू माघारी परतला आहे. पाकिस्तानविरूद्ध रविवारी हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे.

IND vs PAK : आता काय झालं? पाकिस्तानविरूद्धच्या मॅचआधी टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू परतला घरी
Rohit sharma-Rahul dravidImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:43 AM

मुंबई : टीम इंडियाचा सामना उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तान संघासोबत सामना पार पडणार आहे. सुपर-4 मधील टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार आहे. या सामन्याआधी संघातील आणखी एक खेळाडू स्वदेशी परतला आहे. आता मागे जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला होता. त्याला पुत्ररत्न प्राप्त झालं होतं त्यानंतर तो परत एकदा संघासोबत जोडला गेला आहे. मात्र आता बुमराहनंतर कोणता खेळाडू माघारी परतला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आहे. संजू सॅमसन भारतात परतल्याची माहिती समजत आहे. संजूल आशिया कपमध्ये राखीव कीपर म्हणून सोबत ठेवलं होतं. मात्र के. एल. राहुल माघारी परतल्याने त्याला घरचा रस्ता धरावा लागला आहे. राहुल फिट झाल्यावर टीम मॅनेजमेंटने संजू सॅमसन याला माघारी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

नेमकं कारण काय?

आशिया कप स्क्वॉड जाहीर झाल्यावर संजू सॅमसन याला संघात राखीव कीपर म्हणून संघात स्थान दिलं होतं. टीम इंडियाचा के.एल. राहुल दुखापती असल्याने ईशान किशन याला पर्यायी कीपर म्हणून संजूला सोबत घेतलं होतं. मात्र के. एल. राहुल फिट झाल्यावर त्याला आता मायदेशी परतावं लागलं आहे.

टीम इंडियाचा पाकिस्ताविरूद्धचा सामना रविवारी होणार आहे. आशिया कपचा इंडिया-पाकिस्तानमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. रविवारी होणाऱ्या सामन्यावरही पावसाचं संकट असणार आहे. मात्र या सामन्यासाठी  एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा

'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.