Asian Games : बॅटिंग न करता भारतीय संघाला कसं मिळालं गोल्ड, जाणून घ्या या मागचं कारण
IND vs AFG, Asian Games 2023 : भारताने महिला आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. भारताचा अंतिम फेरीत अफगाणिस्तानशी सामना होता. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने रद्द झाला. शेवटी भारताला गोल्ड मेडल देण्यात आलं. का ते जाणून घ्या
मुंबई : भारताने एशियन गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. क्रिकेट, कब्बड्डी आणि हॉकी संघाने सुवर्ण पदक मिळवलं. आतापर्यंत भारताची एकूण पदकांची संख्या 105 इतकी झाली आहे. भारतीय खेळ इतिहासात यापूर्वी कधीच इतकी पदकं मिळाली नव्हती. 2010 मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने 101 पदकं कमावली होती. पण पुरुष क्रिकेट गटाचा अंतिम फेरीचा सामना झालाच नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि 18.2 षटकात 5 गडी गमवून 112 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि सामना होऊ शकला नाही. अखेर भारताला गोल्ड आणि अफगाणिस्तानला रौप्य पदक देऊन गौरविण्यात आलं. चला जाणून घेऊयात या मागचं कारण
का मिळालं भारतीय संघाला गोल्ड मेडल?
पावसामुळे सामना रद्द झाला आणि भारताला गोल्ड मेडल देण्यात आलं आहे. यामुळे अनेकांना प्रश्न पडला की असं कसं झालं. पण पदक रँकिंग पाहून देण्यात आलं आहे. रँकिंगमध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानच्या पुढे आहे. त्यामुळे भारताला गोल्ड आणि अफगाणिस्तानला रौप्य पदक देऊन गौरविण्यात आलं.
भारताने एकही सामना गमावला नाही
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात टीम इंडिया एशियन गेम्समध्ये उतरली होती. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. भारताने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपासून सुरुवात केली. नेपाळला 23 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशला 9 विकेट्स पराभूत केलं. दुसरीकडे, बांगलादेशने पाकिस्ताला डीएलएसच्या आधारावर 6 विकेट राखून पराभूत केलं. त्यामुळे बांगलादेशला कांस्य पदक मिळालं आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने पाकिस्तानला 4 विकेटने पराभूत केलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिष्णोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंह
अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन : जुबैद अकबारी, मोहम्मद शहजाद, नूर अली, शहिदुल्लाह, अफसर झझाई, करिम झनात, गुलबदीन नइब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, फरीद अहमद, झहीर खान, कैस अहमद