IPL 2022 मधील राजस्थान रॉयल्सच्या वादग्रस्त खेळाडूची विजय हजारे ट्रॉफीमध्ये तुफान बॅटिंग, ठोकलं शतक

राजस्थान फ्रेंचायजीने IPL 2023 साठी त्याला रिटेन केलय.

IPL 2022 मधील राजस्थान रॉयल्सच्या वादग्रस्त खेळाडूची विजय हजारे ट्रॉफीमध्ये तुफान बॅटिंग, ठोकलं शतक
Rajasthan RoyalsImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 6:08 PM

मुंबई: सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या एका प्लेयरने तुफानी फलंदाजी केली. त्याने शानदार शतक झळकावलं. IPL 2022 मध्ये हा खेळाडू मैदानावरील वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत आला होता. आता त्याने दमदार फलंदाजी करुन प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचा पुरावा दिलाय. एका आठवड्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने दुसर शतक झळकावलय. मूळाचा हा खेळाडू आसामचा आहे. त्याच्या तुफानी बॅटिंगसमोर सिक्कीमची टीम ढेपाळली. या फलंदाजाच नाव आहे, रियान पराग.

त्याचाच परिणाम फलंदाजीवर दिसतोय

विजय हजारे ट्रॉफीमध्ये रियान पराग आसामच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावतोय. त्याच्यावर IPL फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्सचा विश्वास आहे. राजस्थान फ्रेंचायजीने IPL 2023 साठी रियान परागला रिटेन केलय. कदाचित त्याचाच परिणाम रियान परागच्या फलंदाजीवर दिसून येतोय.

93 चेंडूत 128 धावा

सिक्कीम विरुद्ध आसामने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 307 धावा केल्या. आसामला या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात रियान परागची महत्त्वाची भूमिका राहिली. त्याने 93 चेंडूत 128 धावा फटकावल्या. त्याने या इनिंगमध्ये 5 चौकार आणि 7 सिक्स मारले.

लिस्ट ए मधील दोन शतकं

विजय हजारे ट्रॉफी 2022 मधील हे त्याचं दुसरं शतक आहे. याआधी त्याने राजस्थान विरुद्ध शतक झळकावल होतं. लिस्ट ए करियरमधील ही त्याची दोन शतकं आहेत. रियान पराग शिवाय शिबशंकर रॉयने 50 धावा फटकावल्या. त्यामुळे आसामची धावसंख्या 307 पर्यंत पोहोचली.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.