AUS vs ENG : समालोचन करत असताना रिकी पॉटिंग याच्यावर फेकली द्राक्षं, कृतीनंतर लगेच म्हणाला की…Watch Video
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा कसोटी सामना ओव्हल मैदानात सुरु आहे. मालिका वाचवण्याची धडपड इंग्लंडकडून सुरु आहे. तर ऑस्ट्रेलिया दोन विजयांसह मजबूत स्थितीत आहे. असं असताना प्रेक्षकांनी मर्यादा ओलांडल्याचं चित्र आहे.
मुंबई : ॲशेस कसोटी मालिकेतील पाचवा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तर चौथा सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययाने ड्रॉ झाला आणि इंग्लंडची धाकधूक वाढली. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी इंग्लंडला काही करून हा सामना जिंकवा लागणार आहे. जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका खिशात घालणार आहे. एकीकडे असं गणित असताना दुसरीकडे, इंग्लंडच्या चाहत्यांना ऑस्ट्रेलियाचा विजय पचनी पडलेला दिसत नाही. पहिल्या कसोटीपासून त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. स्टीव्ह स्मिथला तर सळो की पळो करून सोडलं होतं. तर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंग प्रेक्षकांच्या रडारवर आला आहे.प्रतिक्रिया देत असताना त्यांच्यावर द्राक्ष फेकण्यात आली. यामुळे रिकी पॉटिंग चांगलाच संतापला.
नेमकं काय झालं समालोचन करताना…
पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिकी पाँटिंग त्यावर प्रतिक्रिया देत होता. तेव्हा ही घटना घडली. शो होस्ट आणि रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाच्या स्टार स्पिनर टॉड मर्फीची मुलाखत घेत होते.त्याचवेळी रिकी पाँटिंगच्या बुटाजवळ द्राक्ष पडली. त्यामुळे पाँटिंग सुरुवातीला गांगरून गेला. तात्काळ माईकवरच सांगितलं की, कोणी गैरवर्तन केलं याचा शोध घ्या. माझ्यावर द्राक्षं फेकली. मला जाणून घ्यायचं आहे की ही कृती कोणी केली.
Hi @piersmorgan & @TheBarmyArmy
Is this within the spirit of the game?
Pelting grapes at Ponting who’s just a commentator.
I know you’ve lost the Ashes and all talk about Sour grapes pic.twitter.com/xkewu1h8v3
— FIFA Womens World Cup Stan account ⚽️ (@MetalcoreMagpie) July 28, 2023
पाचव्या कसोटीत कशी आहे स्थिती
ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ 283 धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूकने 85 धावांची खेळी केली. त्या व्यतिरिक्त एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मिशेल स्टार्कने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर जोश हेझलवूडने 2, टॉड मर्फीने 2, पॅट कमिन्सने 1 आणि मिशेल मार्शने 1 गडी बाद केला.
पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 1 गडी बाद 73 धावा झाल्या होत्या. डेविड वॉर्नर 24 धावा करून बाद झाला. इंग्लंडला पाचवा कसोटी सामना काही करून जिंकावा लागणार आहे. अन्यथा मालिका ऑस्ट्रेलियाच्या पदरात पडणार आहे.