Rohit Sharma | सेहवाग बनने का शौक है? हिटमॅन रोहित शर्मा ट्रोल
रोहितने 74 चेंडूत 6 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर गावसकर (Border Gavskar Trophy) मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा (16 जानेवारी) दुसरा दिवस. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडिया फलंदाजासाठी आली. पहिली विकेट टीम इंडियाने लवकर गमावली. मात्र हिटमॅन रोहित शर्मा (Hitman Rohit Sharma) चांगली फलंदाजी करत होता. रोहित अर्धशतकाच्या जवळ होता. मात्र सोप्या चेंडूवर रोहितने आपली विकेट टाकली. यामुळे रोहित सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तसेच रोहित ट्विटरवर ट्रेंड होत आहे. (aus vs ind 4th test hitman rohit sharma trolled after throwed his wicket of 44 scored)
टीम इंडियाने पहिली विकेट 11 धावांवर गमावली. युवा सलामीवीर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारासह रोहितने टीम इंडियाचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. रोहित चांगला सेट झाला होता. सामन्याचा 20 वी ओव्हर फिरकीपटून नॅथन लायन टाकायला आला. लायनने या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर फटका लगावला. तिथे उभ्या असलेल्या मिचेल स्टार्कने रोहितचा सोपा झेल घेतला. यासह रोहितने आपली विकेट कांगारुंना बक्षिस म्हणून दिली. रोहितने 74 चेंडूत 6 चौकारांसह 44 धावांची खेळी केली.
रोहित गोलंदाजाच्या चलाखीमुळे नाही तर स्वत:च्या चुकीमुळे बाद झाला. यामुळे रोहितला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं आहे. अनेक मीम्सद्वारे रोहितला ट्रोल केलं आहे.
पाहा भन्नाट मीम्स
Rohit Sharma to Nathan Lyon after settling on crease pic.twitter.com/J5HWKc4VBB
— Shivani (@meme_ki_diwani) January 16, 2021
Rohit Sharma ? pic.twitter.com/8G90dNJRvt
— Vijay Jaiswal (@puntasticVU) January 16, 2021
रोहितने स्वतहून आपली विकेट गमावली. त्यामुळे रोहितचा दानवीर कर्ण असा उल्लेख करण्यात आला आहे.
Respect for Rohit ?#AUSvsIND pic.twitter.com/6sHyvVFGR7
— Circuit ? Expert (@Being_circuit) January 16, 2021
दुसऱ्या दिवसाचा खेळ
पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. टीम इंडियाने 62 धावा करुन 2 विकेट्स गमावल्या. रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. तर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला. दरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. टीम इंडिया दुसऱ्या दिवसखेर 307 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 369 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दूल ठाकूर या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतला.
संबंधित बातम्या :
Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी
Aus vs Ind 4th Test | वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’, पदार्पणातील सामन्यात विक्रमाला गवसणी
(aus vs ind 4th test hitman rohit sharma trolled after throwed his wicket of 44 scored)