AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने 7 व्या विकेटसाठी 123 धावांची शानदार भागीदारी केली.

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने 7 व्या विकेटसाठी 123 धावांची शानदार भागीदारी केली.
| Updated on: Jan 17, 2021 | 1:11 PM
Share

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 4th Test) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) चौथा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) या जोडीने शानदार कामगिरी केली. टीम इंडिया अडचणीत असताना या जोडीने डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी झुंजार शतकी भागीदारी केली.या दोघांनी यासह ब्रिस्बेनवर विक्रमी खेळी केली आहे. या जोडीने ब्रिस्बेनवरील 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. (aus vs ind 4th test shardul thakur and washington sunder sets highest 7th wicket partnership by indian team in brisbane)

विक्रम काय आहे?

कांगारुंनी पहिल्या डावात 369 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडियाची 6 बाद 186 अशी स्थिती झाली होती. शुभमन गिलचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या टॉपच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. 6 बाद 186 स्थिती झाल्याने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळण्याची तीव्र शक्यता होती. मैदानात पदार्पण केलेला वॉशिंग्टन सुंदर आणि दुसरा सामना खेळत असलेला मराठमोळा शार्दुल ठाकूर होता.

या नवख्या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी टीम इंडियाचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. दोघांनी आधी अर्धशतकी त्यानंतर शतकी भागादारी केली. या दोघांनी 59 धावांची भागीदारी करताच ब्रिस्बेनमधील 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या दोघांनी टीम इंडियाच्या मनोज प्रभाकर आणि कपिल देव या माजी क्रिकेटपटुंचा ब्रिस्बेनमधील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभाकर-देव या जोडीने ब्रिस्बेनमध्ये 7 व्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव 336 धावांवर आटोपला आहे. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने शानदार अर्धशतकी खेळी केली. शार्दूल आणि सुंदरने अनुक्रमे 67 आणि 62 धावांची खेळी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला केवळ 33 धावांची आघाडी मिळू शकली. झुंजार खेळीमुळे या दोघांचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | रिषभ पंतची धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली

(aus vs ind 4th test shardul thakur and washington sunder sets highest 7th wicket partnership by indian team in brisbane)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.