AUS vs IND : भारताने मालिका गमावूनही जसप्रीत बुमराहला मोठा पुरस्कार, ऑस्ट्रेलियात सन्मान
Jasprit Bumrah Border Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत शानदार कामगिरी केली. बुमराहने कॅप्टन्सीसह निर्णायक क्षणी चिवट फलंदाजाही केली.
टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 कसोटी मालिकेत 1-3 अशा फरकाने पराभव झाला. टीम इंडियाने या 5 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात विजयाने करत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवण्यात अपयश आलं. भारताने मालिका गमावली, मात्र टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने त्याची छाप सोडली. त्याला जगात अव्वल दर्जाचा गोलंदाज का म्हटलं जातं? हे बुमराहने त्याच्या कामगिरीतून सिद्ध करुन दाखवलं. टीम इंडियाने मालिका गमावली असली तरी जसप्रीत बुमराहला सर्वात मोठा पुरस्कार मिळाला. बुमराहला त्याने केलेल्या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
मालिकेत सर्वाधिक विके्टस, भज्जीच्या विक्रमाची बरोबरी
जसप्रीत बुमराह या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये 13.6 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या. बुमराहने 3 वेळा 5 तर 2 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. बुमराहने यासह हरभजन सिंहच्या विक्रमाची बरोबरी केली. हरभजन सिंह याच्या नावावर टीम इंडियाकडून बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक 32 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. बुमराहला पाचव्या सामन्यातील चौथ्या डावात झालेल्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे बुमराहची हरभजनचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली.
रोहितपेक्षा अधिक धावा
बुमराहने या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मापेक्षा अधिक धावा केल्या. तसेच बुमराहने तिसऱ्या सामन्यात आकाश दीपसह दहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी करत फॉलोऑन टाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. बुमराहने या मालिकेत एकूण 42 धावा केल्या ज्या रोहितपेक्षा अधिक आहेत.
जसप्रीत बुमराह ‘मॅन ऑफ द सीरिज’
5⃣ matches. 3⃣2⃣ Wickets 🫡 Incredible spells ⚡️#TeamIndia Captain Jasprit Bumrah becomes the Player of the series 👏👏#AUSvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/vNzPsmf4pv
— BCCI (@BCCI) January 5, 2025
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.