Australia vs India WTC Final 2023 Highlight | टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन
Australia vs India today WTC Final Match Highlights in Marathi | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरलीय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर विजय मिळवत इतिहास रचलाय.
लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळवण्यात आला. या महामुकाबल्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर विजय मिळवत इतिहास रचलाय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 209 धावांनी विजय मिळवलाय.
ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 173 धावांची मोठी आघाडी होती. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 84.3 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 270 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 270 धावांवर दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे भारताला विजयासाठी 444 धावांचं आव्हान मिळालं.
टीम इंडियाने चौथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 40 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे नाबाद परतले. त्यामुळे दोघांकडून पाचव्या दिवशी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटो कोहली आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी झाली. अवघ्या काही धावांच्या मोबदल्यात टीम इंडियाने पाचव्या दिवशी 7 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा अशाप्रकारे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला.
LIVE Cricket Score & Updates
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | ऑस्ट्रेलियाचा महाअंतिम सामन्यात शानदार विजय
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीप फायनलमध्ये टीम इंडियावर 209 धावांची विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पिययन ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाचा बाजार दुसऱ्या डावात अवघ्या 234 धावांवरच उठला. यासह टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात पराभूत झाली.
ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन
Congratulations, Australia! ??
A roaring victory in the ICC World Test Championship 2023 Final ?#WTC23 | #AUSvIND pic.twitter.com/VE01bWheMQ
— ICC (@ICC) June 11, 2023
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | भारताला नववा झटका
केएस भरत आऊट झाला आहे. यासह भारताने नववी विकेट गमावली आहे. केएसने 23 धावांची खेळी केली.
-
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | भारताला आठवा झटका
टीम इंडियाने आठवी विकेट गमावली आहे. उमेश यादव 1 रन करुन कॅच आऊट झाला आहे. यासह ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | शार्दुल ठाकूर झिरोवर आऊट
टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकुर याला नेथन लायन याने झिरोवर एलबीडबल्यू आऊट केलंय.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | अजिंक्य रहाणे आऊट
टीम इंडियाला सहावा झटका लागला आहे. अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. रहाणेने 46 धावा करुन माघारी परतला आहे.
-
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | रहाणेचा चौकार, टीम इंडियाच्या 200 धावा
रहाणेने क्लास शॉट मारला. यासह टीम इंडियाच्या 52.4 ओव्हरमध्ये 200 धावा पूर्ण झाल्या आहेत.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | रविंद्र जडेजा शून्यावर बाद
टीम इंडियाची पाचव्या दिवसाची अत्यंत वाईट सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने 47 व्या ओव्हरमध्ये 2 मोठे विकेट्स गमावले आहेत. विराट कोहली याच्यानंतर रविंद्र जडेजा हा भोपळा न फोडता माघारी परतला. स्कॉट बॉलेँड याने टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | विराट कोहली आऊट
टीम इंडियाने पाचव्या दिवशी मोठी विकेट गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला चौथा धक्का दिला आहे. बॉलेंडने विराट कोहली याला 49 धावांवर कॅच आऊट केलं आहे. स्टीव्हन स्मिथ याने विराटचा सुंदर कॅच घेतला.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत 3 विकेट गमावून 163 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलंय. त्यामुळे भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 280 धावांची गरज आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | अजिंक्य-विराट जोडीवर मदार
टीम इंडियाला अजिंक्य रहाणे आणि विपाट कोहली या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. हो दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी झाली आहे. ही भागीदारी मोठी होत जावोत, अशीच समस्त भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | टीम इंडिया ओव्हलमध्ये इतिहास रचणार?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अद्याप इतक्या धावांचं आव्हान पूर्ण झालेलं नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी विंडिजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 418 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं. तर टीम इंडियाने 1976 साली विंडिज विरुद्ध 406 धावा पूर्ण करत विजय साकारला होता.
तर ओव्हलमध्ये 263 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. इंग्लंडने आजपासून 121 वर्षांआधी 1902 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यामुळे 444 धावांचं आव्हान तसं फारच आव्हानात्मक समजलं जात आहे. मात्र क्रिकेटमध्ये कधी काहीही होऊ शकतं. टीम इंडियाकडे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
सोप्या भाषेत सांगायंच तर भारताला आज 90 ओव्हरमध्ये म्हणजे 540 बॉलमध्ये 280 धावा पाहिजे आहेत. तर 7 विकेट्स हातात आहे. आता या सामन्याचा निकाल काय लागतो, हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल.
-
Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 5 | टीम इंडियाला विजयासाठी आणखी 280 धावांची गरज
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी पाचव्या दिवशी आणखी 280 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने या 444 पैकी चौथ्या दिवशी 3 विकेट्स गमावून 163 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला आणखी 280 रन्स हव्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 7 विकेट्सची गरज आहे.
Published On - Jun 11,2023 1:04 PM