AUS vs IND: कॅप्टन रोहितने विजयानंतर एकाच शब्दात सर्व सांगितलं, म्हणाला..
Rohit Sharma Post Match Presentation: ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने साऱ्या भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण याच ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 2023 मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत केलं होतं.
19 नोव्हेंबर 2023, टीम इंडिया आणि प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी ठरवूनही न विसरता येणारी तारीख.ऑस्ट्रेलियाने याच तारखेला वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मासह साऱ्या भारतीयांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण सलग 10 विजयानंतर टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंग झालेलं. मात्र 7 महिन्यांनी टीम इंडियाने कांगारुंचा हिशोब चुकता केला आहे. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
कॅप्टन रोहितने केलेली 92 धावांची तुफानी खेळी ही टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाने या जोरावर 205 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात कांगारुंना 171 धावाच करता आल्या. रोहितने टीम इंडियाच्या विजयानंतर साऱ्या भारतीयांच्या भावना एका शब्दात व्यक्त केल्या. रोहितने ‘Satisfying…’ असं म्हटलं. रोहितने केलेल्या 92 धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान प्रतिक्रिया देताना ‘सॅटिस्फाइंग’ या शब्दाने सुरुवात केली. याचाच अर्थ असा की कॅप्टन रोहित विजयाने समाधानी आहे.
“आम्ही प्रतिस्पर्ध्यांकडून काय धोका उद्भवला जाऊ शकतो, हे जाणतो. एक टी म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली. आम्हाला जे करायचं होतं, ते आम्ही केलंय. एक टीम म्हणून आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. 200 ही एक चांगली धावसंख्या आहे, मात्र तुम्ही जेव्हा खेळत असता तेव्हा वारा हा एक फॅक्टर ठरतो, त्यामुळे काहीही होऊ शकतं”, असंही रोहित शर्मा याने नमूद केलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.