AUS vs PAK 1st Test | ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या दिवशी 355 धावांची आघाडी, पाकिस्तानच्या 132 रन्स
Australia vs Pakistan 1st Test 2nd Day Stumps | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवण्या येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
पर्थ | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील यांच्यात कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 53 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 132 धावा केल्या आहेत. इमाम उल हक 38 आणि खुर्रम शहझाद 7 धावांवर नाबाद परतले आहेत. तर त्याआधी अब्दुल्लाह शफीक 42 आणि कॅप्टन शान मसूद 30 धावा करुन माघारी परतले. दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तान ऑस्ट्रेलियाच्यापेक्षा 355 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 487 धावा केल्या.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 346 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 141 धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला झटपट धक्के देत 500च्या आधीच रोखलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 113.2 ओव्हरमध्ये 487 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाडून डेव्हिड वॉर्नर याने आपल्या अखेरच्या कसोटी मालिकेत खेळताना सर्वाधिक 164 धावांची खेळी केली. वॉर्नरने या दरम्यान 16 चौकार आणि 4 षटकार खेचले.
तर उस्मान ख्वाजा याने 41, मार्नस लबुशने याने 16, स्टीव्हन स्मिथ याने 31, ट्रेव्हिस हेड याने 40, मिचेल मार्श 90, एलेक्स कॅरी 34 आणि मिचेल स्टार्क याने 12 धावा केल्या. तर कॅप्टन रॅट कमिन्स याने 9, नॅथन लायन याने 5 धावांचं योगदान दिलं. तर जोश हेझलवूड हा 4 धावांवर नाबाद परतला. पाकिस्तानकडून आमिर जमाल याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. खुर्रम शहजाद याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शाहिन अफ्रिदी आणि फहीम अश्रफ या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
Following Aamir Jamal’s six-fer, Pakistan finish Day Two at 132-2 trailing by 355 runs 🏏#AUSvPAK pic.twitter.com/sHCrsjYqic
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 15, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), टॅव्हिस हेड (उपकर्णधार), डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मिच मार्श, एलेक्स कॅरी, मिशेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवुड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शान मसूद (कॅप्टन), इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, सरफराज अहमद (विकेटकीपर), सलमान अली आगा, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमिर जमाल आणि खुर्रम शहजाद.