AUS vs PAK Test : पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड, पाकिस्तानचं पहिलं स्थान धोक्यात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी मजबूत पकड मिळवली आहे. पाच गडी गमवून ३४६ धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी यात आणखी धावांची भर पडेल यात शंका नाही.
मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून पहिल्याच दिवसावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेवि़ड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी १२६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचं दिसून आला. दुसरीकडे, डेवि़ड वॉर्नर कसोटी कारकिर्दितील शेवटची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात डेविड वॉर्नरने जबरदस्त कामगिरी केली. २११ चेंडूचा सामना करत १६४ धावा केल्या. या खेळीत १६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ५ गडी बाद ३४६ धावा केल्या आहेत. तर मिचेल मार्श आणि एलेक्स कॅरे मैदानात खेळत आहेत. त्यामुळे दुसऱ्या या धावसंख्येत आणखी भर पडेल यात शंका नाही. त्यामुळे पाकिस्ताना हा सामना वाचवण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागणार आहे.
डेविड वॉर्नरने १६४, उस्मान ख्वाजाने ४१, मार्नस लाबुशेननं १६, स्टीव्ह स्मिथने ३१, ट्रेव्हिस हेडने ४० धावा केल्या. तर मिचेल मार्शस नाबाद १५ आणि एलेक्स कॅरे नाबाद १४ धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानकडून अमेर जमालने २, फहीम अश्रफने १, शाहीन अफ्रिदीने १ आणि खुर्रम शहजादने १ गडी बाद केला. तर सलमान आघा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ७० धावा देत एकही गडी बाद करता आला नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना पाकिस्तानने गमवला तर अव्वल स्थान गमवावं लागेल. यामुळे थेट भारताला फायदा होणार आहे. भारतीय संघ गुणतालिकेत थेट पहिलं स्थान गाठणार आहे. कारण भारताची विजयी टक्केवारी ही पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली असणार आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड