AUS vs PAK Test : पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावापासूनच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर आघाडी मिळवली होती. त्यातून पाकिस्तानला डोकंच वर काढता आलं नाही.

AUS vs PAK Test : पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी
AUS vs PAK Test : ऑस्ट्रेलिया पराभूत करणं पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरच, पहिल्या कसोटीत दारूण पराभव
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 2:22 PM

मुंबई : पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 361 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या डावात तर पाकिस्तानचा संपूर्ण 89 धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 233 धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने 449 धावांचं आव्हान पाकिस्तानसमोर ठेवला होता. पण डाव पत्त्यासारखा कोसळला. सउद शकील सोडला तर पाकिस्तानचा एकही फलंदाज 20 च्या वर धावा करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 3, जोश हेझलवूडने 3, नाथन लायनने 2 आणि पॅट कमिन्सने 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाचा खेळ सुरु केला तेव्हा 216 धावांची मजूबत आघाडी होती. या धावसंख्येपुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 5 गडी गमवून 233 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने 449 धावांचं आव्हान दिलं. उस्मान ख्वाजाने 190 चेंडूत 90 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने 45, मिचेल मार्शने नाबाद 68 धावांची खेळी केली. डेविड वॉर्नर 0, मार्नस लाबुशेनने 2 आणि ट्रेव्हिस हेड 14 धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 449 धावांचं पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अब्दुल्ला शफीक 2, इमाम उल हक 10, शान मसूद 2, बाबर आझम 14, सऊद शकील 24, सरफराज अहमद 4, सलमान अली आघा 5, फहीम अश्रफ 5, अमेर जमाल 4, खुर्रम शहजाद 0 धावा करून बाद झाले. तर शाहीन अफ्रिदी 3 धावांवर नाबाद राहीला.

पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांची विजयी टक्केवारी सारखीच असल्याने संयुक्तिकरित्या पहिल्या स्थानावर आले आहेत. आता पुढच्या कसोटी सामन्यावर पाकिस्तानचं स्थान कायम राहतं नाही हे स्पष्ट होईल. दुसरीकडे, मोठ्या फरकाने पराभूत करूनही ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.