AUS vs WI 1st Test | ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सने विजय, विंडिज विरुद्धही हेडचा धमाका
Austraia vs West Indies 1st Test Highlights | ऑस्ट्रेलियाने वेस्ट विंडिज विरुद्ध 26 धावांचा आव्हान हे एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. या सामन्यात ट्रेव्हिस हेड 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.
एडलेड | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने वेस्टइंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने विंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. विंडिजने पहिल्या डावात ऑलआऊट 188 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 283 धावा करत 95 धावांची आघाडी घेतली. विंडिजचा दुसरा डाव 120 धावंवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 26 धावांचं नाममात्र आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न घेता पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना हा 25 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे.
विंडिजला टॉस गमावल्यानंतर बॅटिंगने काही खास करता आलं नाही. विंडिजकडून किर्क मॅकेंझी याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. शामार जोसेफ 26 धाना करुन माघारी परतला.केमार रोच याने 17 नाबाद धावांचं योगदान दिलं. अल्झारी जोसेफ 14 धावांवर बाद झाला. कॅप्टन क्रेग ब्रेथवेट आणि एलिक अथानाजे या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. केवम हॉज याने 12 धावा केल्या. टॅगनारायण चंद्रपॉल आणि जोशुआ डा सिल्वा दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा केल्या. तर जस्टिन ग्रीव्ह याने 5 आणि गुडाकेश मोती 1 अशा धावा करुन आऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि कॅप्टन पॅट कमिन्स या जोडीने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 283 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 119 धावांची शतकी खेळी केली. ट्रेव्हिसने 134 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार आणि 3 सिक्स लगावले. तर उस्मान ख्वाजा याने 45 धावा केल्या. नॅथन लायन याने 24 धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र इतरांना 10-20 च्या पुढे मजल मारता आली नाही अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 95 धावांची आघाडी घेतली. विंडिजकडून शामार जोसेफ याने डेब्यूमध्ये 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. तर केमार रोच आणि जस्टीन ग्रीव्स या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तर अल्झारी जोसेफच्या खात्यात 1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात
What a week in Adelaide! Great vibes for a great win. Next stop, Brissy!
Tickets 🎟️: https://t.co/15SB5UgB2x pic.twitter.com/UHXE8iv3bI
— Cricket Australia (@CricketAus) January 19, 2024
विंडिजला दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त 25 धावाच जास्त करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 26 धावांचं नाममात्र आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. उस्मान ख्वाजा याने 9 धावा केल्या. त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. तर स्टीव्हन स्मिथ याने 11 आणि मार्नस लबुशेन याने 1 धाव करुन नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
विंडिज प्लेईंग ईलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, अॅलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, केमार रोच आणि शामर जोसेफ.