Aus vs WI | ऑस्ट्रेलियाचा 41 बॉलमध्येच विजय, विंडिजचा 3-0 ने सुपडा साफ
Australia vs West Indies 3rd Odi Highlights In Marathi | ऑस्ट्रेलिया विंडिजवर पूर्णपणे वरचढ ठरली. विंडिजला मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. आता उभयसंघात टी 20 मालिका पार पडणार आहे.
कॅनबेरा | वेस्ट इंडिज क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विंडिजने दुसरा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियात 27 वर्षांनी इतिहास रचला. विंडिजने या विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत राखली. मात्र त्यानंतर 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विंडिजला पुरुन उरली. ऑस्ट्रेलियाने विंडिजला 3-0 असा क्लिन स्पीप दिला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं.
ऑस्ट्रेलियाच्या धारदार बॉलिंगसमोर विंडिजला धड 25 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने विंडिजला 24.1 ओव्हरमध्ये 86 धावांवर गुंडाळलं. विंडिजकडून एलिक अथानाजे याने सर्वाधिक 32 धावा केल्या. केसी कार्टली याने 10 आणि रोस्टन चेस याने 12 धावांचं योगदान दिलं. तिघे आले तसेच झिरोवर परत गेले. चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर ओशाने थॉम्स झिरोवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लान्स मॉरिस आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सीन एबोट याला 1 विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 87 धावांचं आव्हान हे अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 7 ओव्हरच्या आतच पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 6.5 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे वनडे सामना हा झटपट जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगुर्क याने सर्वाधिक 41 धावा केल्या. विकेटकीपर बॅट्समन जोस इंग्लिस याने नाबाद 35 धावा केल्या. एरोन हार्डी याने 2 धावा केल्या. तर कॅप्टन स्टीव्हन स्मिथने नाबाद 6 धावा केल्या. विंडिजकडून ओशाने थॉमस आणि अल्झारी जोसेफ या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा 256 बॉल राखून मोठा विजय
An extraordinary performance from Australia in Canberra.
ODIs don’t come much more one-sided than that #AUSvWI pic.twitter.com/6jTViFKSpx
— cricket.com.au (@cricketcomau) February 6, 2024
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), एलिक अथानाझे, टेडी बिशप, केजॉर्न ओटली, केसी कार्टी, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी आणि ओशाने थॉमस.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, जोश इंग्लिस (विकेटकीपर), आरोन हार्डी, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशॅग्ने, शॉन ॲबॉट, विल सदरलँड, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा आणि लान्स मॉरिस.