AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपसाठी फायनल संघ जाहीर, शेवटच्या दिवशी हुकमी एक्क्याची एन्ट्री

ऑस्ट्रेलियाने संघात एक कडक प्लेअरचा समावेश केला असून आता तो चांगलाच फॉर्मात आहे. महत्त्वाचं म्हणजे या खेळाडूचे भारतीय मैदानांवर चांगले आकडे आहेत. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण जाणून घ्या.

ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपसाठी फायनल संघ जाहीर, शेवटच्या दिवशी हुकमी एक्क्याची एन्ट्री
| Updated on: Sep 28, 2023 | 7:38 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी सर्वांनी आपले संघ जाहीर केले होते मात्र संघात काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आज शेवटची तारीख होती. वर्ल्ड कप तोंडावर आला असताना ऑस्ट्रेलियाने संघात मोठा बदल केला आहे. (Marnus Labuschagne in final squad in australia team) ऑस्ट्रेलियाने संघात एक कडक प्लेअरचा समावेश केला असून आता तो चांगलाच फॉर्मात आहे. महत्त्वाचं म्हणजे या खेळाडूचे भारतीय मैदानांवर चांगले आकडे आहेत. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाचा कोणत्या खेळाडूला संधी?

ऑस्ट्रेलिया जाहीर केलेल्या संघामध्ये सर्व खेळाडू फिट आहेत. मात्र त्यांच्या स्क्वॉडमधील एश्टन अगर हा खेळाडू दुखापती होता. वर्ल्ड कपपर्यंत तो फिट होईल अशी आशा सर्वांना होती. आज वर्ल्ड कपमधील स्क्वॉडमध्ये बदल करण्याची शेवटची तारीख होती. परंतु एश्टन अगर हा अद्यापही काही बरा झाला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याच्या जागी हुकमी खेळाडूची संघात एन्ट्री केली आहे.

मार्नस लाबुशेन याचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेत मार्नस लॅबुशेन अचानक बदली खेळाडू मैदानाता उतरला आणि हिरो झाला होता. कॅमेरून ग्रीन दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्या जागी त्याला संघात जागा मिळाली होती, त्यावेळी त्याने नाबाद 80 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान, भारताविरूद्धच्या तिन्ही वन डे सामन्यामध्ये मार्नस लाबूशेन याने तिसरा सामना वगळत काही खास कामगिरी केली नव्हती. तिन्ही सामन्यांमध्ये 39, 27 आणि 72 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे गड्याची निवड होईलच अशी पुसटही शक्यता नव्हती. मात्र नशीबाचा साथ मिळाल्याने त्याची वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. मार्नस लाबुशेन याचा हा पहिला वन डे वर्ल्ड कप असणार आहे.

वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा फायनल संघ जाहीर :-

पॅट कमिन्स (C), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.