IND vs AUS ODI : भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाने निवडली टीम, 3 मोठ्या खेळाडूंचा समावेश

IND vs AUS ODI : व्हाइट बॉल म्हणजे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हे तिन्ही मॅच विनर प्लेयर्स आहेत. या तिघांशिवाय ऑस्ट्रेलियाची बाजू कमकुवत दिसत होती. दुखापतीमुळे हे तिन्ही प्लेयर्स ऑस्ट्रेलियन टीममध्ये नव्हते.

IND vs AUS ODI : भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाने निवडली टीम, 3 मोठ्या खेळाडूंचा समावेश
ind vs aus odiImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 9:26 AM

IND vs AUS ODI Series : भारताविरुद्ध 3 वनडे मॅचच्या सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाने टीमची घोषणा केली आहे. 16 सदस्यीय ऑस्ट्रेलियन टीममध्ये इंजरीनंतर पुनरागमन करणारे 3 खेळाडू आहेत. हे तिन्ही ऑस्ट्रेलियाचे टॉप प्लेयर आहेत. व्हाइट बॉल म्हणजे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हे तिन्ही मॅच विनर प्लेयर्स आहेत. या तिघांशिवाय ऑस्ट्रेलियाची बाजू कमकुवत दिसत होती. दुखापतीमुळे हे तिन्ही प्लेयर्स ऑस्ट्रेलियन टीममध्ये नव्हते. आता फिट होऊन हे तिन्ही प्लेयर्स टीममध्ये परतले आहेत.

ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि झाई रिचर्ड्सन या तीन प्लेयर्सनी इंजरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममध्ये पुनरागमन केलय. या तिघांशिवाय डेविड वॉर्नरचाही वनडे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. हाताचा कोपरा दुखावल्यामुळे डेविड वॉर्नर टीमबाहेर होता. ऑस्ट्रेलियाच्या 16 सदस्यीय वनडे टीमच कर्णधारपद पॅट कमिन्सच्या हाती आहे.

ऑस्ट्रेलियन टीममध्ये मॅक्सवेल रिटर्न

पायाला झालेल्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल मागच्या 4 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. भारताविरुद्ध तो वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसेल. भारताविरुद्ध निवड होण्याआधी ग्लेन मॅक्सवेलने शेफील्ड शील्ड टुर्नामेंटमध्ये खेळून मॅच प्रॅक्टिस केली आहे. 4 वर्षानंतर स्थानिक टीम विक्टोरियाकडून खेळताना त्याचं प्रदर्शन काही खास नव्हतं. पण तरीही ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर विश्वास कायम आहे.

या दोघांचही पुनरागमन

मॅक्सवेल शिवाय मार्श आणि रिचर्डसन सुद्धा टीममध्ये परतले आहेत. मार्शच्या अँकलला दुखापत झाली होती. रिचर्ड्सनला सॉफ्ट टिश्यूची इंजरी होती. आता दोन्ही खेळाडू फिट आहेत. मिचेल मार्श मागच्यावर्षी नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममध्ये नाहीय. रिचर्ड्सन मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियन टीमच्या श्रीलंका दौऱ्यापासून एकही इंटरनॅशनल सामना खेळलेला नाही.

हेझलवूड वनडे टीममध्ये नाही

या 3 टॉप प्लेयर्सनी वनडे टीममध्ये पुनरागमन केलय. जोश हेझलवूडचा मात्र समावेश केलेला नाही. हेझलवूड सध्या इंजर्ड आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि Ashes Series पर्यंत हेझलवूड फिट होईल, अशी अपेक्षा आहे. भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन टीम :

पॅट कमिन्स (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, एडम झम्पा

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.