Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia Tour South Africa 2021 | भारताविरुद्धच्या कामगिरीचा फटका, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता

ऑस्ट्रेलियाचे एकाच वेळेस 2 स्वतंत्र संघ न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत.

Australia Tour South Africa 2021  | भारताविरुद्धच्या कामगिरीचा फटका, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता
ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि टी 20 संघ
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 1:51 PM

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Australia Cricket Team) भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर  (Australia Tour South Africa 2021) जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 19 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत टीम पेन (Tim Paine) कांगारुंचे नेतृत्व करणार आहे. मॅथ्यू वेडला (Matthew Wade) कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. तर त्या जागी अॅलेक्स कॅरीला (Alex Carey) संधी देण्यात आली आहे. (australia announced the t20i squad to tour New Zealand and Test squad to tour South Africa)

बीबीएलमध्ये कॅरीची शानदार कामगिरी

कॅरीने (Alex Carey) बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) मध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्याने 11 सामन्यात 1 शतकासह 400 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला आफ्रिकेविरोधातील कसोटीसाठी संधी देण्यात आली आहे.

4 खेळाडूंना संधी

आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 4 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये सीन एबॉट, माइकल नेसर, मिचेल स्विप्सन आणि मार्क स्टेकिटी यांचा समावेश आहे.

मागील दौऱ्यात 3-1 ने पराभव

ऑस्ट्रेलिया 2018 मध्ये आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. या वेळेस आफ्रिकेने कांगारुंचा कसोटी मालिकेत 3-1 च्या फरकाने पराभव केला होता. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याने बॉल टेम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांना माघारी पाठवण्यात आले होते.

टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड दौरा

ऑस्ट्रेलियाचा संघ एकाच वेळेस आफ्रिका आणि न्यूझींलड दौऱ्यावर जाणार आहे. आफ्रिकेविरुद्ध कसोटी तर न्यूझीलंडविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी स्वतंत्र संघ निवडण्यात आले आहेत. टी 20 मध्ये आरोन फिंचकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टी 20 मालिका

कसोटी मालिकेतून वगळण्यात आलेल्या वेडला न्यूझीलंड विरुद्धातील टी 20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया 7 फेब्रुवारीला न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची आणखी एक टीम आफ्रिकेला कसोटी मालिकेसाठी निघणार आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टीन लॅंगर आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तर अँड्रयू मॅक्डोनाल्ड हे न्यूझीलंड दौऱ्यातील संघासोबत असणार आहेत.

आफ्रिकेविरुद्धातील कसोटी मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, सीन एबॉट, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, मोइसेस हेनरिक्स, नॅथन लायन, माइकल नीसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टीकटी, मिचेल स्वैपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, एश्टन एगर, जेसन बेहरेनडॉर्फ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमोट, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तनवीर संघा, डी आर्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, एंड्रयू टाय आणि एडम झॅम्पा.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 22 फेब्रुवारी, ख्राईस्टचर्च

दुसरा सामना, 25 फेब्रुवारी, डुनेडिन

तिसरा सामना, 3 मार्च, वेलिंग्टन

चौथा सामना, 5 मार्च, ऑकलंड

पाचवा सामना, 7 मार्च, माउंट मांगुनई

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!

(australia announced the t20i squad to tour New Zealand and Test squad to tour South Africa)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.