World Cup 2023 : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये तब्बल 48 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला, कांगारूंनी पाकिस्तानची जिरवली!
PAK vs AUS : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात कांगारूंनी आपला पहिला विजय साकार केला. वर्ल्ड कपमध्ये तळाला असलेल्या कांगारूंच्या संघाने पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्यामध्ये कांगारूंनी विजयाचा श्रीगणेशा केला. ऑस्ट्रेलिय संघाने 62 धावांनी पाकिस्तान संघावर विजय मिळवला. पाकिस्तान संघाचा हा दुसरा पराभव असून कांगारूनी पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यामध्ये शाहिन आफ्रिदी सोडता सगळे बॉलर फेल गेलेले दिसले. या सामन्यात 48 वर्षांनी एक रेकॉर्ड मोडला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 367-9 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पाकिस्तान संघाविरूद्ध सगळ्यात मोठी धावसंख्या केली आहे. पाकिस्तानविरूद्ध 350 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला संघ ठरल आहे. याआधी कोणत्याही संघाने पाकिस्तान संघाविरूद्ध 350 धावा केल्या नाहीत.
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध 300हून अधिक धावा करण्याची ही 9वी वेळ आहे. परंतु याआधी कोणताही संघ 350 धावा करू शकला नव्हता. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यामध्ये अनेकवेळा पारडं दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेलं दिसत होतं. मात्र स्पिनर अॅडम जम्पा याने मोक्याच्या वेळी विकेट घेत सामना फिरवला. सामना फिरवलाच नाहीतर पाकिस्तानच्या मुख्य फलंदाजांना आऊट करत आपली छाप पाडली.
दरम्यान, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम परत एकदा अपयशी गेला. बाबरचा फॉर्म संघासाठी चिंतेचा फॉर्म ठरत चालला आहे. कारण बाबर नाही चालला तर संघाची फलंदाजी कमकुवत झाल्यासारखी दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (C), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (WK), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (C), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (Wk), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रॉफ