AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | सगळं चाललं असतं पण असं बोलून भारतीयांच्या मनातून उतरला ‘हा’ मॅचविनर!

World Cup Final 2023 : वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. वर्ल्ड कपसाठी तगड्या भारतीय संघाची घोषणा झालीये. मात्र एक मॅचविनर खेळाडू असं काही बोलला की ज्यामुळे तो मनातून उतरलाय.

World Cup 2023 | सगळं चाललं असतं पण असं बोलून भारतीयांच्या मनातून उतरला 'हा' मॅचविनर!
| Updated on: Sep 09, 2023 | 4:11 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. वर्ल्ड कपमधील दहा देशांनी आपल्या संघांची घोषणी केली आहे. आयसीसीने सर्व संघांना 5 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची नावे जाहीर करण्यास सांगिली होतीत. यंदा फायनलमध्ये कोणता संघ जाणार याबाबत आजी माजी खेळाडू भाकित करत आहेत. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार खेळाडू मिचेल मार्श यानेही फायनलमध्ये कोणते संघ जातील याबाबत अंदाज वर्तवला आहे.

काय म्हणाला मिचेल मार्श?

वर्ल्ड कपच्या फायनलबाबत बोलताना, फायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रिलिया या दोन संघांमध्ये होईल, असं भाकित वर्तवलं आहे. सोशळ मीडियावर मिचेल मार्श याला ट्रोल केलं जात आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने आजी-माजी खेळाडूंनी भाकित वर्तवलीत त्यामध्ये भारत फायनलमध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र मार्शला पाकिस्तान संघावर इतका कसा काय विश्वास आहे? असा सवाल चाहते करत आहेत.

टीम इंडियाला यंदाच्या वर्ल्डकपध्ये प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण घरच्या मैदानांवर सामने होणार असल्याने त्याचा फायदा सर्व खेळाडूंना होणार आहे. मिचेल मार्शला वाटतं की भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार नाही. पाकिस्तान भारतामध्ये येत फायनलपर्यंत बाजी मारेल हा त्याला विश्वास आहे, मात्र भारतीय खेळाडूंच्या घरच्या मैदानावर असूनही ते फायनलपर्यंत नाही मजल मारणार असं त्याला वाटत आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबतच होणार आहे. वर्ल्ड कप थरार 5 ऑक्टो़बरपासून सुरू झाल्यावर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि कांगारू आमने-सामने येणार आहेत. मिचेल मार्श याच्या वक्तव्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. मात्र याचा वचपा म्हणजे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजल्यावर मार्शला कोणता संघ फायनलमध्ये जाणार हे लक्षात येईल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.