Australia vs India | “विराट आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती टीम इंडियासाठी नुकसानकारक”

विराटची पत्नी अनुष्का शर्मा गर्भवती आहे. यामुळे विराट मंगळवारी भारतात परतणार आहे. तर पहिल्या सामन्यात बॅटिंगदरम्यान मोहम्मद शमीला दुखापत झाली. या दुखापतीमुळे शमीला या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे.

Australia vs India | विराट आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती टीम इंडियासाठी नुकसानकारक
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 5:15 PM

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत टीम इंडियावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यानच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दुखापत झाली. शमीला या दुखापतीमुळे या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. यामुळे मोहम्मद शमी आणि विराट कोहली टीम इंडियासाठी कसोटी मालिकेत उपलब्ध नसतील. विराट आणि शमी संघात नसणं, हे टीम इंडियासाठी नुकसानकारक आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जो बर्न्सने दिली आहे. australia vs india the absence of virat and Shami is big loss to Team India said Joe Burns

बर्न्स काय म्हणाला?

“कसोटी मालिकेतील उर्वरित 3 सामन्यांसाठी विराट आणि मोहम्मद शमी नसतील. हे टीम इंडियासाठी नुकसानकारक आहे. पण टीम इंडियाकडे शेवटपर्यंत फलंदाजी करु शकतील असे खेळाडू आहे. विराट जागतिक पातळीचा खेळाडू आहे. त्याची उणीव भरुन काढणं हे सोपं नाही. विराटच्या जागी संघात कोणाला संधी मिळते, याकडे आमचं लक्ष असणार आहे. आम्ही दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार सराव करतोय. टीम इंडिया पहिल्या सामन्यात पराभूत झाली. मात्र टीम इंडिया या मालिकेत कमबॅक करु शकते. मात्र आम्हाला विजयीरथ कायम ठेवावा लागेल, असं बर्न्स म्हणाला. बर्न्स पत्रकारांशी संवाद साधत होता. यावेळेस त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली.

वार्नर आणि पुकोवस्कीबाबत काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की हे दोघे दुखापतीने ग्रस्त आहेत. या दोघांना दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले. या दोघांच्या पुनरागमनाबाबत बर्न्सला प्रश्न विचारण्यात आला. यावर बर्न्स म्हणाला की, ” या दोघांच्या पुनरागमनाबाबत मला काही माहिती नाही. वॉर्नर मेलबर्नमध्ये आहे तर आम्ही अ‌ॅडिलेडला आहोत. या दोघांबद्दल लवकरच समजेल”.

पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी

या कसोटी मालिकेआधी बर्न्सच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र बर्न्सने या प्रश्नांना आपल्या बॅटिंगने उत्तर दिलं. बर्न्सने पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. बर्न्सने नाबाद 51* धावा केल्या. दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा 26 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India Test | मोबाईल बंद करा, बाहेरील चर्चांकडे दुर्लक्ष करा, मोहम्मद कैफचा टीम इंडियाला सल्ला

Australia vs India 2nd Test | ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खेळाडूला मिळणार खास मेडल

Australia vs India 2nd Test | “टीम इंडिया अडचणीत, मदतीसाठी द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा”

australia vs india the absence of virat and Shami is big loss to Team India said Joe Burns

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.