ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीतून होणार बाद! कसं काय ते सर्व समजून घ्या
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 10 वर्षानंतर आपल्या खिशात घातली आहे. यासह गुणतालिकेत दुसरं स्थान गाठून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाचं समीकरण बिघडू शकतं. एक समीकरण उलटं पडलं तर सर्वच हवा निघून जाईल.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 3-1 ने खिशात घातली आहे. यासह दक्षिण अफ्रिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा सामना पाहायला मिळणार आहे. असं सर्व असताना ऑस्ट्रेलियासाठी एक समीकरण महागात पडू शकतं. खरं हे अशक्यप्राय गणित आहे. पण कधी काय होईल सांगता येत नाही. कारण क्रिकेट अनिश्चितता असणारा खेळ आहे. त्यामुळे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटची मालिका ऑस्ट्रेलिया श्रीलंका यांच्यात होत आहे. दोन सामन्यांची ही औपचारिक मालिका असल्याचं बोललं जात आहे. पण काहीही होऊ शकतं. ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 63.67 विजयी टक्केवारी आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर दुसऱ्या स्थानावरील संघ आहे.
श्रीलंकेने दोन सामन्याची मालिका 2-0 ने जिंकली तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारीत घट होत 57.02 होईल. तर श्रीलंकेची विजयी टक्केवारी 53.85 इतकी राहील. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित कसं जुळून येईल असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर कसोटी क्रिकेटमध्ये जिंकण्यापेक्षा स्लो ओव्हर रेट हा खूपच महत्त्वाचा प्वॉइंट आहे. खरं तर इंग्लंडचे स्लो ओव्हर रेटसाठी 22 गुण कापले गेले नसते तर आज पहिला पात्र ठरलेला संघ हा इंग्लंड असता. कारण सध्या इंग्लंडचे गुणतालिकेत 43.18 ही विजयी टक्केवारी आहे. जर 22 गुण कापले गेले नसते तर आज 65.18 ही विजयी टक्केवारी असती आणि क्वालिफाय केलं असतं.
श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 2-0 ने पराभूत केलं आणि स्लो ओव्हर रेटचं गणित जुळून आलं तर श्रीलंकेला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने 8 गुणांचा फरक राहील. जर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 2-0 ने पराभूत केलं तर.. पण ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आणि 8 अतिरिक्त गुण कापले गेले तर मात्र श्रीलंकेला संधी मिळेल. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. दुसरीकडे, भारताचे 50 टक्के गुण असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला असून 2 गुण कापले गेले आहेत.