AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिसेस एण्ड मिसेस गार्डनर…महिला क्रिकेटरने केले मैत्रिणी सोबत लग्न, शुभेच्छा देण्यासाठी लागली रिघ

ऑस्ट्रेलियाची अनुभवी महिला क्रिकेटपटू अ‍ॅशले गार्डनर हीने तिची मैत्रीण मोनिकासोबत अखेर लग्न केले आहे. गार्डनर हीने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर पांढऱ्या गाऊनमधील तिच्या आणि मोनिकाच्या लग्नाचा फोटो अपलोड केला आहे. त्यानंतर या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी रिघ लागली आहे.

मिसेस एण्ड मिसेस गार्डनर...महिला क्रिकेटरने केले मैत्रिणी सोबत लग्न, शुभेच्छा देण्यासाठी लागली रिघ
| Updated on: Apr 06, 2025 | 9:26 PM
Share

ऑस्ट्रेलियाची स्टार महिला क्रिकेटपटू अ‍ॅशले गार्डनर हीने आपल्या आयुष्याचा साथीदार अखेर निवडला आहे. तिने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केली आहे. दोघींनी गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. या शुभ प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक महिला खेळाडू उपस्थित होत्या. दोन महिला क्रिकेटपटूचे हे लग्न क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरले आहे. आक्रमक फलंदाजी आणि ऑफ स्पिन आणि जबददस्त फिल्डींग साठी ओळखली जाणारी अ‍ॅशले गार्डनर हीचे लग्न तिच्या करीयरमध्ये आणखी एक मैलाचा टप्पा ठरले आहे. एश्ले गार्डनर आणि मोनिका यांनी एप्रिल २०२४ मध्ये साखरपुडा केला होता. या कपलने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता.

अ‍ॅशले गार्डनर ( Ashleigh Gardner ) आणि मोनिका ( Monica ) यांनी एका खाजगी समारंभात एक मेकांसाठी जगण्याच्या शपथा घेतल्या. गार्डनरने लग्नाचा फोटो शेअर करताना लिहीलंय की मिसेस एण्ड मिसेस गार्डनर ! या लग्नाला ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू एलिसा हीली, एलिस पेरी,किम गार्थ आणि एलिस विलानी हजर होत्या. गार्डनर यांनी दोनांचे चार हात झाल्यानंतर सोशल मीडियावर ही बातमी पोस्ट केली. तर त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची रिघ लागली.

भारतात आयोजित महिला प्रिमीयर लीग ( डब्ल्यूपीएल) २०२५ चा एक शानदार सीझन पूर्ण केला असतानाच अ‍ॅशले गार्डनरच्या लग्नाची गोड बातमी आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर जेव्हा गार्डनर गुजरात जायंट्स क्रमवारीत सर्वात खाली असताना गार्डनर हीला साल २०२५ साठी टीमचे कप्तान केले होते. तिच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स मध्ये मोठा बदल झाला. गार्डनरच्या कप्तानीमध्ये टीम एलिमिनेटर राऊंडपर्यंत पोहचली. त्यामुळे केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर एक कर्णधार म्हणूनही तिची योग्यता सिद्ध झाली. परंतू गुजरात जायंट्स अखेर हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स टीम बरोबर हरली.

प्रत्येक फॉरमॅटमध्ये एक विश्वासार्ह ऑलराऊंडर प्लेअर

अ‍ॅशले गार्डनर हीने अलिकडेच डब्ल्यूपीएल 2025 मध्ये सहभाग घेतला. तसेच गुजरात जॉयंट्सची कर्णधार म्हणून तिने चांगला खेळ केला होता. वुमेन प्रीमियर लीगच्या आधी एश्ले गार्डनर ऑस्ट्रेलियन टीमचा हिस्सा होती. तिने मार्च मध्ये न्यूझीलँडचा दौरा केला होता. या मालिकेने तिच्या आधीच बहरलेल्या कारकीर्दीला आणखी चार चांद लागले. कारण तिने ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटमध्ये प्रमुख कामगिरी केली आहे. मग टी २० असो की वनडे वा टेस्ट गार्डनर प्रत्येक फॉरमॅटमध्ये एक विश्वासार्ह ऑलराऊंडर प्लेअर बनली आहे. जी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही खेळात सामना पलटवण्यासाठी समर्थ आहे.

राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.