Smriti Mandhana मुळे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम ट्रोल
WPL Auction 2023 :. मुंबईत WPL च पहिलं ऑक्शन पार पडलं. या WPL ऑक्शनमुळे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम टि्वटरवर ट्रोल झाला. स्मृती मांधनाला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांचा बाबर आजमशी ट्रोल होण्याचा काय संबंध?
WPL Auction 2023 : भारतात काही घडल्यास, त्याचा परिणाम पाकिस्तानतही दिसून येतो. मुंबईत WPL च पहिलं ऑक्शन पार पडलं. या WPL ऑक्शनमुळे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम टि्वटरवर ट्रोल झाला. याचं कारण आहे WPL च्या ऑक्शनमध्ये स्मृती मांधनाला मिळालेली कोट्यवधीची रक्कम. आता तुम्ही म्हणाल, स्मृती मांधनाला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांचा बाबर आजमशी ट्रोल होण्याचा काय संबंध? याच कारण आहे WPL आणि PSL मध्ये दोन्ही खेळाडूंना मिळणारा पैसा.
साडेसहापट जास्त पैसा
WPL मध्ये स्मृती मांधनाची बेस प्राइस 50 लाख रुपये होती. पण तिला बेस प्राइसपेक्षा साडेसहापट जास्त पैसा मिळाला. मांधनावर पैशांचा पाऊस पडला. याच रक्कमेच्या तुलनेतून टिे्वटरवर बाबर आजम आणि PSL ट्रोल झाले.
#SmritiMandhana Babar Azam Price in PSL – 2.30 CR SMRITI MANDHANA – 3.4 Cr
And they Compare PSL with IPL ??#WPLAuction #WPL2023 @mandhana_smriti pic.twitter.com/EXBxSvfKs9
— Sunny Yadav (@SunnyYa67011052) February 13, 2023
Babar Azam and other Pakistani players while watching this Auction.#WPLAuction #WomensIPL pic.twitter.com/RAlP4rSgeD
— Jai Upadhyay (@jay_upadhyay14) February 13, 2023
No Bid for Babar Azam in#WPLAuction2023 ???♂️ pic.twitter.com/K7S5IAM29R
— Cricastic (@writter_vambu) February 13, 2023
मांधनामुळे बाबर आजम वाईट पद्धतीने ट्रोल
स्मृती मांधनाला WPL Auction मध्ये 3.40 कोटी रुपये मिळाले. या रक्कमेसह लीगमधील ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मांधनला एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर टि्वटरवर बाबर आजमला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. WPL आणि PSL मधील मोठा फरक
टि्वटरवरील ट्रेंड पाहून तुम्हाला WPL आणि PSL मधील फरक लक्षात आला असेल. PSL मध्ये खेळणाऱ्या प्लेयर्सना किती पैसा मिळतो, ते सुद्धा समजलं असेल. त्या तुलनेत पहिल्याच सीजनमध्ये WPL मधील प्लेयर्सना मोठी रक्कम मिळाली. टि्वटर ट्रेंडनुसार, WPL मध्ये स्मृती मांधनला मिळणारी रक्कम PSL मध्ये बाबर आजमला मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा दुप्पट आहे.