AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam : पैशा-पैशाला तरसतोय पाकिस्तान, फक्त इतक्या रुपयात बाबरच्या मॅचची तिकीट विकण्यासाठी मजबूर

Babar Azam : पाकिस्तान पैशा-पैशाला तरसतोय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचं परदेशी मुद्रा भंडार रिकामी होतोय. त्यांच्याकडे कर्मचाऱ्याचे वेतन देण्या इतपतही पैसा नाहीयत.

Babar Azam : पैशा-पैशाला तरसतोय पाकिस्तान, फक्त इतक्या रुपयात बाबरच्या मॅचची तिकीट विकण्यासाठी मजबूर
Babar Azam
| Updated on: Feb 03, 2023 | 3:02 PM
Share

लाहोर : पाकिस्तान पैशा-पैशाला तरसतोय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचं परदेशी मुद्रा भंडार रिकामी होतोय. त्यांच्याकडे कर्मचाऱ्याचे वेतन देण्या इतपतही पैसा नाहीयत. पाकिस्तानची हालत इतकी खराब आहे की, त्यांच्याकडे रेल्वे पास, डीझेल खरेदी करण्याइतपतही पैसे उरलेले नाहीत. या कठीण परिस्थितीत, पुढच्या काही दिवसात पाकिस्तान सुपर लीगच आयोजन होणार आहे. त्याच काऊंटडाऊन सुरु झालय.

5 फेब्रुवारीला मॅच

13 फेब्रुवारीला ही लीग सुरु होईल. मात्र त्याआधी पाकिस्तान टीमचा विद्यमान कॅप्टन बाबर आजम आणि माजी कर्णधार सरफराज अहमद यांच्यात सामना पहायला मिळेल. बलूचिस्तान क्रिकेट असोशिएशनने बाबर आजम इलेव्हन आणि सरफराज अहमद इलेव्हन दरम्यान 5 फेब्रुवारीला मॅच आयोजित केली आहे.

पाकिस्तानचे 2 कॅप्टन आमने-सामने

बाबर पेशावर जाल्मी आणि सरफराज क्वेटा ग्लॅडिटर्सचा कॅप्टन आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या आधी दोन्ही टीम्सममध्ये 5 फेब्रुवारीला सामना खेळला जाईल. बाबर कदाचित या सामन्याबद्दल फार उत्साहित नाहीय. पाकिस्तान लीगच्या आयोजकांना या सामन्यासाठी खूप स्वस्तात तिकीट विकावी लागतायत. 6 रुपयात विकल्या तिकीट्स

एग्जीबिशन सामन्याच्या तिकीटाची किंमत 20 पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय करन्सीमध्ये 6 रुपये आहे. कंगालीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला एग्जीबिशन सामन्याची 20 रुपयाची तिकीट विकत घेतालानाही विचार करावा लागतोय. आयोजकांसमोर स्टार खेळाडू खेळणार असल्याने गर्दी जमवण्याच आव्हान आहे. पाकिस्तानात सध्या गव्हाच्या पीठासाठी मारामाऱ्या सुरु आहेत. पेशावर आणि क्वेटा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या एग्जीबिशन मॅचमध्ये बाबर आजम, सरफराज अहमद यांच्याशिवाय नसीम शाह, उमर अकमल, शाहिद आफ्रिदी, वहाब रियाज, मोहम्मद हॅरिस हे स्टार खेळाडू खेळणार आहेत.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.